Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 चार वर्षे संपल्यावर अबशालोम राजाला म्हणाला, “मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पुढे चार वर्षानी अबशालोम राजा दावीदाला म्हणाला, हेब्रोनमध्ये मी परमेश्वरास नवस बोललो होतो. तो फेडण्यासाठी मला जाऊ द्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 चार वर्षे पूर्ण झाल्यावर, अबशालोम राजाला म्हणाला, “मला हेब्रोन येथे जाऊ द्यावे म्हणजे मी याहवेहला केलेला आपला नवस फेडीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:7
10 Iomraidhean Croise  

अबशालोम पळून गशूरास गेला; तेथे तो तीन वर्षे राहिला.


हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे : इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र;


कर्मेली नाबालाची स्त्री अबीगईल हिच्यापासून त्याला किलाब झाला, हा त्याचा दुसरा पुत्र; गशूराचा राजा तलमय ह्याची कन्या माका हिच्यापासून त्याला तिसरा पुत्र अबशालोम झाला;


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


पाहा, तुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता व दुष्टपणाने ठोसाठोशी करता; तुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही.


आणि त्यांना बेथलेहेमास पाठवताना म्हटले, “तुम्ही जाऊन त्या बालकाविषयी बारकाईने विचारपूस करा, व तुम्हांला शोध लागल्यावर मला कळवा म्हणजे मीही येऊन त्याला नमन करीन.”


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan