Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 दावीद डोंगरमाथ्यावर पोहोचला येथे तो अनेकदा देवाची आराधना करत असे. त्या वेळी हूशय अर्की त्यास भेटायला आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता. त्याने डोक्यात माती घालून घेतलेली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 दावीद जेव्हा डोंगराच्या माथ्यावर जिथे लोक परमेश्वराची उपासना करीत असत तिथे जाऊन पोहोचला, तेव्हा अर्कीचा हूशाई त्याची वस्त्रे फाटलेली व डोक्यात धूळ घातलेला असा दावीदास भेटण्यास तिथे होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:32
20 Iomraidhean Croise  

ह्यानंतर तिसर्‍या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले.


तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.


दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सीबा हा भेटला; खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, खिसमिसांचे शंभर घड, अंजिराच्या शंभर ढेपा व द्राक्षारसाचा एक बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती.


अबशालोम सर्व इस्राएल लोकांसह यरुशलेमेला आला व त्याच्याबरोबर अहीथोफेलही आला.


मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.”


तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.


आशेर व आलोथ ह्यांत हूशयाचा पुत्र बाना हा होता;


अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.


हे परमेश्वरा, ऊठ; माझ्या देवा, मला तार; तू माझ्या सर्व वैर्‍यांच्या तोंडात मारले आहेस; तू दुर्जनांचे दात पाडले आहेत.


आणि संकटसमयी माझा धावा कर; मी तुला मुक्त करीन आणि तू माझा गौरव करशील.“


तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन; संकटसमयी मी त्याच्याजवळ राहीन; मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन;


मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले,


मग ती बेथेलापासून लूज येथे जाते व अर्की लोकांच्या सीमेवरून अटारोथ येथे निघते;


त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला; त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan