Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 दावीद शोक करत जैतूनाच्या डोंगरावर गेला. मस्तक झाकून, अनवाणी तो चालत राहिला त्याच्याबरोबरच्या लोकांनीही त्याचे अनुकरण केले तेही रडत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 परंतु दावीद जैतुनाच्या डोंगराकडे रडत रडतच चालत चढत होता; त्याने आपले मस्तक झाकून घेतले होते व अनवाणी चालत होता. त्याच्याबरोबर असलेल्या सर्व लोकांनीसुद्धा आपले मस्तक झाकून ते रडत रडत वर चढले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:30
21 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोक व अब्याथार ह्यांनी देवाचा कोश परत यरुशलेमेला नेला व ते जाऊन तेथे राहिले.


राजा आपले मुख झाकून मोठा विलाप करून म्हणाला, “अरेरे! माझ्या पुत्रा अबशालोमा! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!”


यवाब घरात राजाकडे जाऊन म्हणू लागला, “आपल्या सेवकांनी आज आपला, आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचवला आहे; त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे.


मर्दखय परत राजद्वारी आला आणि हामान विलाप करत व आपले मस्तक झाकून घेऊन लगबगीने आपल्या घरी गेला.


“तुझा देव कोठे आहे?” असे ते मला सतत म्हणतात, म्हणून अहोरात्र माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.


हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.


उसासा मुकाट्याने टाक; मृतांसाठी शोक करू नकोस, डोक्याला शिरोभूषण घाल, पायांत जोडा घाल, आपले ओठ झाकू नकोस, सुतकात लोक अन्न पाठवतात ते खाऊ नकोस.”


तुम्ही आपल्या डोक्यांस शिरोभूषणे घालाल, पायांत जोडे घालाल; तुम्ही शोक करणार नाही, रडणार नाही, तर आपल्या अधर्माने झुराल व एकमेकांना पाहून उसासे टाकाल.


आणि त्या दिवशी यरुशलेमेसमोर पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या झाडांच्या डोंगराला त्याचे पाय लागतील तेव्हा जैतुनाच्या झाडांचा डोंगर पूर्वपश्‍चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे उत्पन्न होईल. अर्धा डोंगर उत्तरेकडे व अर्धा डोंगर दक्षिणेकडे सरेल.


‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’


मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले,


तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,


मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला,


तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे.


मग तो बाहेर येऊन आपल्या परिपाठाप्रमाणे जैतुनांच्या डोंगराकडे गेला व त्याचे शिष्यही त्याच्या मागोमाग गेले.


मग यरुशलेमेजवळ म्हणजे शब्बाथ दिवसाच्या मजलेवर असलेल्या जैतुनांचा डोंगर म्हटलेल्या डोंगरावरून ते यरुशलेमेस परत आले.


आनंद करणार्‍यांबरोबर आनंद करा आणि शोक करणार्‍यांबरोबर शोक करा.


एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते; एका अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan