Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तेव्हा अबशालोम त्याला म्हणे, “पाहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे; पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमलेला नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तेव्हा अबशालोम म्हणे, तुमचे म्हणणे खरे आहे, पण राजा तुमच्या अडचणीत लक्ष घालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा अबशालोम त्याला म्हणत असे, “पाहा, तुझे दावे कायदेशीर आणि यथायोग्य आहेत, परंतु तुझे ऐकण्यासाठी राजाचा कोणीही प्रतिनिधी तिथे नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:3
16 Iomraidhean Croise  

अबशालोम त्याला आणखी म्हणे, “मला ह्या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते? एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण माझ्याकडे आणले असते तर मी त्याला न्याय दिला असता.”


दाविदाने सर्व इस्राएलावर राज्य केले; तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व निष्पक्षपातीपणे वागे.


ते एकमेकांशी असत्य भाषण करतात, ते दुटप्पीपणाने खुशामतीचे शब्द बोलतात,


आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख, म्हणजे जो देश तुझा देव परमेश्वर तुला देत आहे त्यात तू चिरकाळ राहशील.


कोणी आपल्या बापाला किंवा आईला शिव्याशाप दिले तर त्याला अवश्य जिवे मारावे.


सज्जनाला परमेश्वराचा प्रसाद घडतो, परंतु दुष्टपणाच्या युक्ती योजणार्‍याला तो दोषी ठरवतो.


बापाला शाप देणारा व “तुला आशीर्वाद प्राप्त होवो” असे आईला न म्हणणारा अशा लोकांचा एक वर्ग आहे.


जो डोळा बापाची थट्टा करतो, आईचे ऐकणे तुच्छ मानतो, त्याला खोर्‍यातले डोमकावळे टोचून बाहेर काढतील, त्याला गिधाडांची पिले खाऊन टाकतील.


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.


ते मोशे व अहरोन ह्यांच्याविरुद्ध जमा होऊन त्यांना म्हणाले, “तुमचे आता फारच झाले! सबंध मंडळी पवित्र आहे, तसेच प्रत्येक मनुष्य पवित्र आहे आणि परमेश्वर त्यांच्याठायी आहे; तर मग तुम्ही परमेश्वराच्या मंडळीवर वर्चस्व का गाजवता?”


कारण देवाने असे म्हटले आहे की, तू ‘आपल्या बापाचा व आईचा सन्मान कर’, आणि ‘जो बापाची किंवा आईची निंदा करतो त्याला देहान्त शिक्षा व्हावी.’


पौलाने म्हटले, “बंधुजनहो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते; कारण ‘तू आपल्या लोकांच्या अधिकार्‍याविरुद्ध वाईट बोलू नकोस’ असे शास्त्रात लिहिले आहे.”


सर्वांना मान द्या. बंधुवर्गावर प्रीती करा. ‘देवाचे भय धरा.’ राजाचा मान राखा.


विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. ते उद्धट, स्वच्छंदी, थोरांची निंदा करण्यास न भिणारे, असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan