Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 पण मी तुझ्यावर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पाहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 पण तो माझ्यावर प्रसन्न नसेल तर त्याच्या मनात असेल ते माझे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 परंतु जर याहवेहने म्हटले, ‘मी तुझ्यावर प्रसन्न नाही,’ तर मी तयार आहे; त्यांना जे बरे वाटते तसे याहवेह माझे करो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:26
18 Iomraidhean Croise  

हिंमत धर, आपण आपल्या लोकांसाठी आणि आपल्या देवाच्या नगरांसाठी लढाईची शिकस्त करू, मग परमेश्वर त्याच्या मर्जीस येईल तसे करो.”


तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला; पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली.


माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”


त्याने मला प्रशस्त स्थळी बाहेर आणले, त्याने मला सोडवले, कारण माझ्यामध्ये त्याला संतोष होता.


ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”


ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला.


धन्य आपला देव परमेश्वर; त्याने आपणावर प्रसन्न होऊन आपल्या वतीने आपण राजा व्हावे म्हणून आपणाला आपल्या गादीवर स्थापन केले आहे; आपल्या देवाने इस्राएलावर प्रेम करून त्याची कायमची स्थापना करण्याचे म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.”


मी मौन धरले आहे, आपले तोंड उघडत नाही, कारण हे तूच केले आहेस.


पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.


ह्यापुढे तुला सोडलेली म्हणणार नाहीत, ह्यापुढे तुझ्या भूमीला वैराण म्हणणार नाहीत; तर तुला हेफसीबा (ती माझा आनंद) व तुझ्या भूमीला बऊल (विवाहित) म्हणतील; कारण तू परमेश्वराला आनंद देणारी आहेस, तुझी भूमी सधवा होईल.


हा कोन्या तुच्छ, फुटक्या पात्रासारखा माणूस आहे काय? तो नापसंत पात्र आहे काय? त्याला व त्याच्या संतानाला माहीत नाही अशा देशात त्यांना का फेकून दिले आहे?


मी त्यांच्याविषयी आनंद पावून त्यांचे कल्याण करीन व मी मनापासून जिवाभावाने त्यांची ह्या देशात खरोखर लागवड करीन.


परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामधाचे प्रवाह वाहणार्‍या देशात आम्हांला नेईल आणि तो देश आम्हांला देईल.


हिज्कीयाला मनश्शे; मनश्शेला आमोन; आमोनाला योशीया;


आता आम्ही तुझ्या हातात आहोत; तुला बरे व योग्य दिसेल तसे आमचे कर.”


तेव्हा इस्राएल लोक परमेश्वराला म्हणाले, “आम्ही पाप केले आहे; तुला बरे दिसेल तसे कर, मात्र आज आमचा बचाव कर, एवढीच आमची विनवणी आहे.”


शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काही लपवले नाही. मग तो म्हणाला, “परमेश्वरच तो, त्याला जसे बरे वाटेल तसे तो करो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan