Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 राजा सादोकास म्हणाला, “देवाचा कोश नगरात परत घेऊन जा; परमेश्वराची कृपादृष्टी माझ्यावर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोश व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 राजा दावीद सादोकाला म्हणाला, हा देवाचा कोश यरूशलेमेला परत घेऊन जा. परमेश्वराची कृपा असेल तर तो मला पुन्हा येथे आणेल. यरूशलेम आणि हे त्याचे मंदिर मला पुन्हा पाहता येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 नंतर दावीद राजाने सादोकाला म्हटले, “परमेश्वराचा कोश परत शहरात घेऊन जा. जर याहवेहच्या दृष्टीत मी कृपा पावलो असलो तर याहवेह मला परत आणतील यासाठी की मी कोश व याहवेहचे निवासस्थान पुन्हा पाहू शकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:25
19 Iomraidhean Croise  

लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”


“आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ” असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.


परमेश्वर आमचा देव ह्याच्या घरासाठी तुझ्या कल्याणासाठी मी झटत जाईन.


हे परमेश्वरा, तुझे वसतिस्थान, तुझ्या गौरवाचे निवासस्थान ही मला प्रिय आहेत.


खरोखर तुझ्या अंगणातील एक दिवस हा सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या तंबूत राहण्यापेक्षा माझ्या देवाच्या घराचा द्वारपाळ होणे2 मला इष्ट वाटते.


तू आपल्या उद्धरलेल्या लोकांना स्वकरुणेने नेले आहे; आपल्या बलाने तू त्यांना आपल्या पवित्र निवासाकडे घेऊन गेला आहेस.


मोशे परमेश्वराला म्हणाला, “पाहा, तू मला म्हणतोस की, ‘ह्या लोकांना घेऊन जा’; पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे मला अजून कळवले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की, ‘मी तुला व्यक्तिश: नावाने ओळखतो, आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे.’


आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असल्यास, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे.”


हिज्कीयाने म्हटले होते, “मी परमेश्वराच्या मंदिरात चढून जाईन ह्याचे चिन्ह काय?”


ह्यास्तव तू त्यांना ह्या सर्व वचनांचा संदेश सांग; त्यांना असे सांग की, ‘परमेश्वर उच्च स्थलावरून गर्जना करील; तो आपल्या पवित्र निवासातून शब्द उच्चारील; तो आपल्या कळपावर गर्जना करील; द्राक्षे तुडवणार्‍यांप्रमाणे तो पृथ्वीच्या सर्व रहिवाशांविरुद्ध आरोळी करील.


‘हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर, हे परमेश्वराचे मंदिर’ असे बोलून लटक्या भाषणावर भिस्त ठेवू नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan