Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणार्‍या रस्त्यात उभा राही आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्याला बोलावून “तू कोणत्या नगराचा आहेस,” असे विचारी; तेव्हा तो म्हणे, “तुझा दास इस्राएलाच्या अमुक अमुक वंशातला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 रोज लवकर ऊठून सकाळीच तो वेशीपाशी जाई. आपल्या अडचणी घेऊन निवाड्यासाठी राजाकडे जायला निघालेल्या लोकांस भेटून त्यांच्याशी बोलत असे. चौकशी करून तो विचारी, तू कोणत्या शहरातून आलास? तो सांगत असे, मी इस्राएलच्या अमुक वंशातला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तो सकाळी लवकर उठत असे आणि शहराच्या वेशीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला थांबत असे. जेव्हा कोणी राजाकडे तक्रार आणत असे तेव्हा अबशालोम त्याला बोलावून विचारत असे, “तू कोणत्या नगराचा आहेस?” तो उत्तर देत असे, “आपला सेवक इस्राएलातील गोत्रांपैकी एका गोत्राचा आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:2
13 Iomraidhean Croise  

त्यावर हमोर व त्याचा मुलगा शखेम ह्यांनी आपल्या नगराच्या वेशीकडे जाऊन नगरवासी लोकांशी असे बोलणे लावले की,


तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांना कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांकडे पळून गेले. दावीद यरुशलेमेस परत येतो


ते त्याला म्हणाले, “आपण ह्या लोकांवर मेहेरनजर करून ह्यांना संतुष्ट राखाल आणि मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर हे आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.”


खुनी मनुष्य मोठ्या पहाटेस उठून दीनदुबळ्यांचा घात करतो; रात्री तो चोर बनतो.


मोशे लोकांसाठी काय काय करीत आहे हे त्याच्या सासर्‍याने पाहिले तेव्हा तो म्हणाला, “तू लोकांसाठी हे काय करीत आहेस? तू एकटाच बसतोस आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व लोक तुझ्याभोवती उभे राहतात ते का?”


त्यांचे काही प्रकरण असले म्हणजे ते माझ्याजवळ येतात, तेव्हा मी त्यांचा आपसात निवाडा करतो आणि देवाचे विधी व नियम त्यांना समजावून सांगतो.”


ते प्रत्येक वेळी लोकांचा न्यायनिवाडा करीत; कठीण प्रकरणे मोशेकडे आणत, पण लहानसहान प्रकरणांचा निकाल ते स्वतः करत.


कारण दुष्कर्म केल्यावाचून त्यांना झोप येत नाही; कोणाला पाडले नाही, तर त्यांची झोप उडते.


मग त्याच्या जागी, त्यांनी राजपदाचा मान न दिलेला असा एक हलका मनुष्य उदयास येईल; पण तो लोक निर्धास्त असता येईल व आर्जवी भाषणे करून राज्य मिळवील.


प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली;


तुझ्या गावात रक्तपात किंवा मारहाण ह्या बाबतीत वाद उपस्थित होऊन त्याचा निर्णय करणे तुझ्या आवाक्याबाहेर असले तर लगेच तुझा देव परमेश्वर ह्याने निवडलेल्या स्थानी जा,


इकडे बवाज वेशीत जाऊन बसला; इतक्यात बवाज ज्या जवळच्या आप्ताविषयी बोलला होता तोही तेथे आला; तेव्हा तो म्हणाला, “अरे गृहस्था, येथे येऊन बस.” तेव्हा तो जाऊन तेथे बसला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan