Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 15:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 यज्ञ करीत असताना अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहीथोफेल ह्याला त्याचे नगर गिलो येथून बोलावून आणले. बंड वाढत गेले व अबशालोमाकडे लोक एकसारखे जमत गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अहिथोफेल हा तेव्हा दावीदाचा एक सल्लागार होता. हा गिलो या गावाचा होता. यज्ञ करत असताना अबशालोमने अहिथोफेलला गिलोहून बोलावून घेतले. सर्व काही अबशालोमच्या योजने प्रमाणे सुरळीत चालले होते. त्यास अधिकाधिक पाठिंबा मिळत होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अबशालोम यज्ञार्पण करीत असताना, त्याने दावीदाचा सल्लागार गिलोनी अहीथोफेल याला सुद्धा त्याचे नगर गिलोह येथून बोलाविले. त्यामुळे कटकारस्थानाला अधिक बळ मिळत गेले व अबशालोमच्या मागे जाणाऱ्यांची संख्या वाढत गेली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 15:12
26 Iomraidhean Croise  

कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


अबशालोम सर्व इस्राएल लोकांसह यरुशलेमेला आला व त्याच्याबरोबर अहीथोफेलही आला.


अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.


आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले.


माकाथीचा पुत्र अहसबय ह्याचा पुत्र अलीफलेट, अहीथोफेल गिलोनी ह्याचा पुत्र अलीयम,


त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला, आणि नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले.


तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा;


अहीथोफेल हा राजाचा मंत्री होता; आणि हूशय अर्की हा राजाचा मित्र होता.


हे परमेश्वरा, माझ्यावर दया करून मला उठव, म्हणजे मी त्यांचा बदला घेईन.


जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे.


दुर्जनाचा यज्ञ परमेश्वराला वीट आणतो, परंतु सरळाची प्रार्थना त्याला आनंद देते.


दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते; त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्‍चित्त म्हणून आणले तर मग ते किती अधिक वीट आणणारे असणार?


शबाहून ऊद व दूर देशाहून अगरू माझ्याकडे आणण्याचे काय प्रयोजन? तुमच्या होमबलींनी मला संतोष नाही, तुमचे यज्ञबली मला पसंत नाहीत.


मग बलाम बालाकाला म्हणाला, “माझ्यासाठी येथे सात वेद्या बांध आणि माझ्यासाठी सात गोर्‍हे व सात मेंढे तयार ठेव.”


तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


बालाकाने बलामाच्या म्हणण्याप्रमाणे केले; त्याने प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत; तरी ‘ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लाथ उगारली आहे,’ हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे.


आपण देवाला ओळखतो असे ते बोलून दाखवतात; परंतु कृतींनी त्याला नाकारतात. ते अमंगळ, आज्ञाभंजक व प्रत्येक चांगल्या कामास नालायक आहेत.


गोशेन, होलोन व गिलो, अशी अकरा नगरे व त्यांखालील खेडी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan