२ शमुवेल 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मला गशूराहून का आणले? तेथेच मी आजवर राहिलो असतो तर बरे झाले असते, असा निरोप तुझ्या हाती राजाला पाठवावा म्हणून मी तुला येथे ये, असे सांगून पाठवले होते. तर आता मला राजाचे दर्शन करवून दे; मी दोषी असलो तर त्याने मला मारून टाकावे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 अबशालोम यवाबाला म्हणाला, “मी निरोप पाठवून तुला बोलावणे धाडले होते. तुला मी राजाकडे पाठवणार होतो. गशूरहून त्याने मला का बोलावले ते मी तुला त्यास विचारायला सांगणार होतो. मी त्याचे दर्शन घेऊ शकत नसेन तर गशूरहून मी इथे का आलो? तेव्हा मला त्यास भेटू दे. माझा काही अपराध असला तर त्याने मला मारून टाकावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 अबशालोम योआबाला म्हणाला, “पाहा, मी तुला बोलाविणे पाठवित म्हटले, ‘येथे ये म्हणजे मी तुला राजाकडे हे विचारण्यास पाठवेन, “गशूरहून मी का आलो? मी अजूनही तिथेच असतो तर ते माझ्यासाठी बरे झाले असते!” ’ तर आता मला राजाला भेटावयाचे आहे, जर माझ्याठायी काही दोष असेल, तर त्यांनी मला जिवे मारावे.” Faic an caibideil |