Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 सर्व इस्राएलात सौंदर्याविषयी प्रशंसनीय असा अबशालोमासारखा कोणी नव्हता; त्याच्या ठायी नखशिखांत काही दोष नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 अबशालोमच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करत होते. इस्राएलमध्ये त्याचा रुपाला तोड नव्हती. त्याच्या पायाच्या तळव्यापासून तर डोक्यापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 सर्व इस्राएलात सुंदरतेविषयी प्रशंसनीय असा अबशालोमसारखा कोणी नव्हता. डोक्याच्या माथ्यापासून तळपायापर्यंत त्याच्या ठायी काही दोष नव्हता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:25
11 Iomraidhean Croise  

“तू हे काय करतोस?” असे विचारून त्याच्या बापाने त्याला जन्मात कधी दुखवले नव्हते. तो फार रूपवान होता; अबशालोमाच्या मागून तो जन्मला होता.


मग सैतान परमेश्वरासमोरून गेला; आणि त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखान्त अतिशय पिडले.


सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्‍या स्त्रीची प्रशंसा होते.


पायाच्या तळव्यापासून मस्तकापर्यंत काहीच धड नाही; जखमा, चेंचरलेले व पुवळलेले घाय आहेत; ते कोणी पिळून काढत नाही, त्यांवर कोणी पट्टी बांधत नाही, कोणी तेलाने नरम करीत नाही.


त्याच्या कंबरांना पट्टे असून डोक्यात उंची व रंगीत पागोटी होती; ते सर्व पुरुष वीरांप्रमाणे दिसत असून त्यांची ढब खास्दी देशातील बाबेलच्या पुरुषांप्रमाणे होती.


अव्यंग, सुरूप, सर्व व्यवहारांत दक्ष, ज्ञानसंपन्न, विद्यापारंगत आणि राजवाड्यात वागण्यास योग्य असे तरुण पुरुष घेऊन यावे आणि त्यांना खास्द्यांची विद्या व भाषा शिकवावी.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही चुना लावलेल्या कबरांसारखे आहात; त्या बाहेरून खरोखर सुंदर दिसतात, परंतु आत मेलेल्यांच्या हाडांनी व सर्व प्रकारच्या घाणीने भरलेल्या आहेत.


आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी, म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी.


परमेश्वर तुझे गुडघे व पाय ह्यांवर, किंबहुना तळव्यापासून डोक्यापर्यंत गळवे निर्माण करून तुला पीडा देईल.


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


त्याचा शौल नावाचा एक मुलगा होता, तो तरुण व देखणा होता; इस्राएल लोकांत त्याच्याइतका देखणा कोणी नव्हता; तो एवढा उंच होता की सर्व लोक त्याच्या केवळ खांद्याला लागत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan