२ शमुवेल 14:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 तेव्हा यवाबाने साष्टांग दंडवत घालून राजाला आशीर्वाद दिला आणि म्हटले, “माझे स्वामीराज, आपली कृपादृष्टी माझ्यावर आहे हे आज आपल्या दासाला कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 यवाबाने राजाला वाकून अभिवादन केले राजाचे अभीष्ट चिंतून तो म्हणाला, तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहात हे मी जाणतो. माझी विनंती तुम्ही मान्य केलीत यावरुन मी हे ताडले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 योआबाने राजाला सन्मान व आशीर्वाद देण्यासाठी भूमीकडे तोंड करून दंडवत घातले. योआब म्हणाला, “आज आपल्या सेवकास समजले की त्याच्या धनीराजाच्या नजरेत तो कृपा पावला आहे, कारण राजाने आपल्या सेवकाची विनंती मान्य केली आहे.” Faic an caibideil |