Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेव्हा यवाबाने तकोवा येथे जासूद पाठवून एका चतुर स्त्रीला बोलावून आणले; तो तिला म्हणाला, “तू सुतक्याचे मिष करून सुतकाचा पेहराव घाल, अंगास तेल लावू नकोस आणि मृतासाठी बहुत दिवस शोक करणारी अशी स्त्री बन;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेव्हा तकोवा शहरात निरोप्याला पाठवून त्याने तेथील एका चतुर स्त्रीला बोलावणे पाठवले. तिला तो म्हणाला, तू खूप दु:खात असल्याचे ढोंग कर. त्यास शोभेसे कपडे कर. नटू सजू नको. अनेक दिवस मृताचा शोक करीत असलेल्या स्त्रीसारखी तू दिसली पाहिजेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तेव्हा योआबाने कोणा एकाला तकोवा येथे पाठवले आणि तिथून एका शहाण्या स्त्रीला बोलावून आणले. तो तिला म्हणाला, “तू शोक करीत असल्याचे ढोंग कर. शोकवस्त्रे परिधान कर, आणि सुवासिक तेल अंगाला लावू नकोस. आणि पुष्कळ दिवसांपासून मृत व्यक्तीसाठी शोक करीत असल्याचे ढोंग कर.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:2
17 Iomraidhean Croise  

तेथून ती निघून गेली आणि आपला बुरखा काढून आपली वैधव्यवस्त्रे पुन्हा ल्याली.


आपला नवरा उरीया मृत्यू पावला आहे असे उरीयाच्या स्त्रीने ऐकले तेव्हा ती नवर्‍यासाठी शोक करू लागली.


मग दावीद जमिनीवरून उठला; त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली; मग तो आपल्या मंदिरात आला, त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, ते त्याने सेवन केले.


तेव्हा नगरातून एका शहाण्या बाईने हाक मारून म्हटले, “ऐका हो, ऐका; यवाबाला सांगा, अंमळ जवळ ये, मला तुला काही सांगायचे आहे.”


हेलस पलती, इक्केश तकोई ह्याचा पुत्र ईरा,


तेव्हा यराबाम आपल्या स्त्रीला म्हणाला, “चल, तू यराबामाची स्त्री आहेस हे कोणाला ओळखता येणार नाही अशा प्रकारे वेष पालट आणि शिलो येथे जा; जो माझ्याविषयी बोलला होता की, मी ह्या लोकांचा राजा होईन तो अहीया संदेष्टा येथे राहतो.


परमेश्वर अहीयाला म्हणाला, “यराबामाची स्त्री आपल्या मुलाविषयी विचारण्यासाठी येत आहे; तो आजारी आहे; तू तिला असे सांग; आपण कोणी दुसरी स्त्री आहोत असे सोंग करून ती आत येईल.”


बेथलेहेम, एटाम, तकोवा,


ते अगदी पहाटेस उठून तकोवाच्या अरण्यात जाण्यास निघाले; ते जाऊ लागले तेव्हा यहोशाफाट उभा राहून म्हणाला, “अहो यहूद्यांनो, अहो यरुशलेमनिवासी जनहो, ऐका; तुमचा देव परमेश्वर ह्याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यांवर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”


पदायाच्या शेजारी पुढे आलेल्या मोठ्या बुरुजासमोर ओफेलच्या कोटापर्यंत तकोवाकरांनी डागडुजी केली.


त्यांच्या शेजारी तकोवाकरांनी डागडुजी केली; पण त्यांच्या महाजनांनी आपल्या मानेवर आपल्या प्रभूच्या कामाचे जू घेतले नाही.


म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


तुझी वस्त्रे सदा शुभ्र असोत; तुझ्या डोक्याला तेलाची वाण नसो.


बन्यामीनवंशजहो, यरुशलेमेतून रक्षणार्थ पळून जा, तकोवात रणशिंग फुंका, बेथ-हक्करेमावर ध्वज उभारा; कारण उत्तरेकडून अरिष्ट व मोठा नाश डोकावत आहे.


तकोवा येथील मेंढपाळांतला आमोस ह्याला, यहूदाचा राजा उज्जीया व इस्राएलाचा राजा योवाशाचा पुत्र यराबाम ह्यांच्या काळात, भूमिकंपापूर्वी दोन वर्षे, इस्राएलाविषयी दृष्टान्तरूपाने प्राप्त झालेली वचने ही :


तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू;


तर तू नाहणमाखण कर. चांगली वस्त्रे लेऊन खळ्यात जा, पण त्याचे खाणेपिणे संपेपर्यंत त्याच्या नजरेस पडू नकोस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan