Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 राजाने विचारले, “ह्या प्रकरणात यवाबाचा हात आहे की नाही?” त्या स्त्रीने उत्तर केले, “माझे स्वामीराज, आपल्या जीविताची शपथ, जे काही माझे स्वामीराजे बोलले आहेत त्यापासून कोणाला उजवीडावीकडे जाता येत नाही; आपला सेवक यवाब ह्यानेच मला आज्ञा केली व ह्या सर्व गोष्टी त्यानेच आपल्या दासीच्या तोंडी घातल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 राजा म्हणाला, तुला हे सर्व बोलायला यवाबाने सांगितले ना? ती म्हणाली, होय महाराज, तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सर्व बोलायला सांगितले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 राजाने विचारले, “या सर्व गोष्टींमध्ये योआबाचा हात नाही काय?” त्या स्त्रीने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाच्या जीविताची शपथ, माझे धनीराजा जे सांगतात त्यापासून कोणीही उजवी किंवा डावीकडे वळू शकत नाही. होय, तो आपला सेवक योआब होता ज्याने मला हे करण्यास सुचविले व आपल्या सेविकेच्या मुखात शब्द घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:19
22 Iomraidhean Croise  

उरीया दाविदाला म्हणाला, “कोश, इस्राएल व यहूदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत; असे असताना मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही.”


राजाने तिला उत्तर दिले, “जे काही मी तुला विचारत आहे ते माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “स्वामीराजांनी बोलावे.”


मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले.


मी हे केले असते तर मी आपला जीव धोक्यात घातला असता; तूही माझ्याविरुद्ध झाला असतास कारण राजापासून कोणतीच गोष्ट लपून राहत नाही.”


अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


तो दोष यवाबाच्या व त्याच्या सगळ्या पितृकुळाच्या माथी येवो; आणि यवाबाच्या वंशात स्रावी, महारोगी, काठी टेकत चालणारा, तलवारीने पडणारा किंवा अन्नान्न करणारा असा कोणी ना कोणी असल्यावाचून राहणार नाही.”


तुझे हस्त बद्ध केले नव्हते; तुझ्या पायांत बेड्या घातल्या नव्हत्या; अधर्म्यांपुढे जसा कोणी पतन पावतो तसा तू पतन पावलास.” हे ऐकून लोक त्याच्यासाठी पुन्हा रडू लागले.


एलीया अलीशाला म्हणाला, “परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब.” अलीशा म्हणाला, “परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही.” मग ते बेथेल येथे गेले.


तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी त्याच्या व तुझ्या मुखाला साहाय्य होईन, आणि तुम्ही काय करायचे ते तुम्हांला शिकवीन.


एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे; पण एखाद्याचा शोध लावणे ह्यात राजांचा गौरव आहे.


तू डावीउजवीकडे वळू नकोस; दुष्कर्मातून आपले पाऊल काढ.


तेव्हा कृपा करून आम्हांला तुझ्या देशातून पलीकडे जाऊ दे; आम्ही कोणाच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात पाऊल टाकणार नाही किंवा विहिरीचे पाणी पिणार नाही; आम्ही नीट राजमार्गाने कूच करू आणि तुझ्या हद्दीतून बाहेर पडेपर्यंत उजवीकडे किंवा डावीकडे वळणार नाही.”


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


ज्या गोष्टींविषयी मी तुला आज आज्ञा करीत आहे त्यांच्यापासून उजवीडावीकडे वळून अन्य देवांच्या नादी लागणार नाहीस व त्यांची सेवा करणार नाहीस तर असे घडेल.


म्हणून तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा काळजीपूर्वक पाळा; उजवीडावीकडे वळू नका.


मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर, आणि माझा सेवक मोशे ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ; ते सोडून उजवीडावीकडे वळू नकोस, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील.


तेव्हा हन्ना म्हणाली, “माझे स्वामी! आपल्या जीविताची शपथ, माझे स्वामी, जी स्त्री आपल्याजवळ येथे उभी राहून परमेश्वराची प्रार्थना करत होती तीच स्त्री मी आहे.


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


दावीद प्रतिज्ञापूर्वक म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझ्या बापाला पक्के ठाऊक आहे म्हणून तो म्हणतो की ही गोष्ट योनाथानाला कळू नये; कारण त्याला फार वाईट वाटेल; बाकी परमेश्वराच्या जीविताची व तुझ्या जीविताची शपथ, माझ्यामध्ये व मृत्यूमध्ये केवळ एका पायरीचे अंतर आहे.”


तर आता, अहो माझे स्वामी, परमेश्वराच्या जीविताची शपथ व आपल्या जीविताची शपथ, परमेश्वराने आपणाला रक्तपात करण्यापासून व आपल्या हाताने सूड घेण्यापासून आवरले आहे; म्हणून आता आपले शत्रू व माझ्या स्वामींची हानी चिंतणारे ह्यांचे नाबालासारखे होवो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan