Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 आपल्या दासीने विचार केला की, माझ्या स्वामीराजांच्या शब्दाने मला शांती मिळेल; कारण माझे स्वामीराजे ह्यांना देवदूताप्रमाणे बर्‍यावाइटाचा निर्णय करता येतो; तर आपला देव परमेश्वर आपल्याबरोबर असो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 स्वामी, तुमच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल हे मी जाणून होते. कारण तुम्ही देवदूतासारखेच आहात. बरे वाईट तुम्ही जाणता आणि देव परमेश्वराची तुम्हास साथ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “आणि आता आपली सेविका म्हणते की, ‘माझ्या राजाचा, स्वामीचा शब्द माझे वतन सुरक्षित ठेवो, कारण माझ्या धनीराजाला परमेश्वराच्या दूतासारखी चांगले आणि वाईट याची ओळख आहे. याहवेह आपला परमेश्वर आपल्याबरोबर असो.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:17
13 Iomraidhean Croise  

राजाने तिला उत्तर दिले, “जे काही मी तुला विचारत आहे ते माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “स्वामीराजांनी बोलावे.”


ह्या गोष्टीचे स्वरूप बदलावे म्हणून आपला सेवक यवाब ह्याने हे केले आहे; धनीमहाराज देवदूतासारखे चतुर आहेत, आणि पृथ्वीवर जे काही होते ते सर्व त्यांना कळते.”


माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा.


माझ्या बापाचे सर्व घराणे स्वामीराजासमोर मृतवत होते; तरी आपण आपल्या दासाची आपल्या पंक्तीस बसणार्‍यांमध्ये नेमणूक केली; महाराजांजवळ आणखी दाद मागायचा मला काय हक्क आहे?”


राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.


ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”


माझ्या जिव्हेच्या ठायी काही अन्याय आहे काय? माझ्या तोंडाला अधर्माची रुची कळत नाही काय?”


रुप्यासाठी मूस व सोन्यासाठी भट्टी, तशी मनुष्यासाठी प्रशंसेची कसोटी होय.


जो आपल्या शेजार्‍याची खुशामत करतो तो त्याच्या पावलांसाठी जाळे पसरतो.


पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


जसे आम्ही सर्व बाबतीत मोशेचे ऐकत होतो तसेच आम्ही तुझेही ऐकू; मात्र तुझा देव परमेश्वर मोशेबरोबर होता तसाच तुझ्याबरोबर असो.


आखीश दाविदाला म्हणाला, “मला ठाऊक आहे की तू माझ्या दृष्टीने देवदूतासारखा चांगला आहेस; तरी पलिष्ट्यांचे सरदार म्हणतात की तू त्यांच्याबरोबर लढाईला जाऊ नयेस.


Lean sinn:

Sanasan


Sanasan