Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आपल्या सर्वांना मरणे प्राप्त आहे; आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत, ते पुन्हा भरून घेता येत नाही; देव प्राणहरण करत नसतो तर घालवून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालवून दिला जाऊ नये अशी योजना करत असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आपण सर्वच कधीतरी मरण पावणार आहोत. जमिनीवर पडलेल्या पाण्यासारखी आपली स्थिती होणार आहे. सांडलेले पाणी पुन्हा भरता येत नाही. देव क्षमाशील आहे हे तुम्ही जाणता. स्वसंरक्षणासाठी पळालेल्याच्या बाबतीतही देवाची काही योजना असते. देव त्यास आपल्यापासून पळायला लावत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जसे जमिनीवर सांडलेले पाणी पुन्हा गोळा करता येत नाही, तसेच आपणही मेले पाहिजे. परंतु परमेश्वराची तशी इच्छा नाही; तर घालवून दिलेला व्यक्ती कायमचा त्यांच्यापासून घालवून दिला जाऊ नये अशी योजना परमेश्वर करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:14
31 Iomraidhean Croise  

दावीद त्या जासुदाला म्हणाला, “तू जाऊन यवाबाला सांग, ह्यावरून तू उदास होऊ नकोस, कारण तलवार दोन्ही पक्षांचा सारखाच संहार करते, तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर; ह्या प्रकारे तू त्याला हिंमत दे.”


मी आता आपल्या स्वामीराजांना विनंती करायला आले आहे ह्याचे कारण हेच की लोकांनी मला घाबरवून सोडले आहे, म्हणून आपल्या दासीने विचार केला की, महाराजांना जाऊन सांगावे म्हणजे ते आपल्या दासीच्या विनंतीप्रमाणे करतील.”


शलमोनाच्या वर्तनास्तव मी दाविदाच्या संततीला दु:ख भोगायला लावीन, पण ते सर्वकाळ नाही.”


मनुष्य मृत झाल्यावर पुन्हा जिवंत होईल काय? माझी सुटका होईपर्यंत कष्टमय सेवेचे सगळे दिवस मी वाट पाहत राहीन.


मला ठाऊक आहे की तू मला मृत्युवश करशील; सर्व जीवधारी ज्या स्थळी एकत्र होणार आहेत त्याप्रत मला पोचवशील.


तर सर्व जीवधार्‍यांचा एकदम प्राणान्त होईल; मानव पुन्हा मातीत मिळेल.


जो अमिरांची भीड राखत नाही, जो श्रीमंताला गरिबांहून अधिक मानत नाही, (कारण ते सर्व त्याच्या हाताने निर्माण झाले आहेत.) त्याला निर्दोष ठरवणे उचित होईल काय?


मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे; माझ्या हाडांचे सर्व सांधे ढिले झाले आहेत; माझे हृदय मेणासारखे झाले आहे; ते आतल्या आत वितळले आहे.


माझी शक्ती आटून खापरीसारखी झाली आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तू मला मरणाच्या धुळीस मिळवत आहेस.


वाहणार्‍या लोंढ्याप्रमाणे ते वाहून जावोत; तो बाण रोखील तेव्हा ते भंग पावल्याप्रमाणे होवोत.


त्याची दया कायमची नाहीशी झाली काय? त्याचे अभिवचन पिढ्यानपिढ्या निष्फळ राहणार काय?


त्यांनी यरुशलेमेभोवती त्यांचे रक्त पाण्यासारखे वाहवले; त्यांना पुरण्यास कोणी राहिले नाही.


आमचे आयुष्य सत्तर वर्षे आणि शक्ती असल्यास फार तर ऐंशी वर्षे असले, तरी त्याचा डामडौल केवळ कष्टमय व दु:खमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो.


तू मनुष्याला पुन्हा मातीस मिळवतोस, आणि म्हणतोस, “अहो मानवांनो, परत जा.”


एखाद्याला मारून टाकण्याच्या हेतूने कोणी टपून बसला नव्हता; पण देवाने त्याला त्याच्या हाती पडू दिले, तर त्याला पळून जाण्यासाठी मी तुला स्थान नेमून देतो.


आपल्याला मरायचे आहे हे जिवंतांना निदान कळत असते; पण मेलेल्यांना तर काहीच कळत नाही; त्यांना आणखी काही फलप्राप्ती होणार नसते; त्यांचे स्मरण कोणाला राहत नाही.


कारण प्रभू कायमचा त्याग करणार नाही;


प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन वाचावे ह्याने मला संतोष होतो ना?


त्यांनी माझ्याविरुद्ध अपराध केला ह्यात त्यांची व त्यांच्या वाडवडिलांची दुष्टता होय असे ते कबूल करतील,


ही सहा नगरे इस्राएल लोकांसाठी, त्यांच्यातल्या परक्यासाठी व उपर्‍यासाठी आश्रयस्थाने म्हणून नेमली आहेत; एखाद्याने चुकून मनुष्यवध केला तर त्याने तिकडे पळून जावे.


मग मनुष्यवध करणार्‍या त्या मनुष्याला, रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याच्या हातून सोडवून ज्या शरणपुरात तो पळून गेला होता तेथे त्याला मंडळीने पुन्हा पोचते करावे; आणि पवित्र तेलाने अभिषेक केलेला मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्याने तेथेच राहावे.


कारण मुख्य याजक मरेपर्यंत त्या मनुष्यवध करणार्‍याने शरणपुरातच राहायचे होते; पण मुख्य याजक मेल्यावर पाहिजे तर त्याने आपल्या वतनात परत जावे.


त्यांनी आपल्या शिष्यांना हेरोद्यांसह त्याच्याकडे पाठवून म्हटले, “गुरूजी आम्हांला ठाऊक आहे की, आपण खरे आहात, परमेश्वराचा मार्ग खरेपणाने शिकवता व कोणाची भीड धरत नाही; कारण आपण तोंड पाहून बोलत नाही.


तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला :


कारण देवाजवळ पक्षपात नाही.


कारण तुमचा देव परमेश्वर हा देवाधिदेव, प्रभूंचा प्रभू, महान, पराक्रमी व भययोग्य देव असून तो कोणाचा पक्षपात करत नाही किंवा लाच घेत नाही.


ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे,


जो तोंडदेखला न्याय करत नाही, तर ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे न्याय करतो त्याला जर तुम्ही ‘पिता म्हणून हाक मारता,’ तर आपल्या प्रवासाच्या काळात भिऊनच वागा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan