Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ती म्हणाली, “आपल्या दासीला स्वामीराजांशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी.” तो म्हणाला, “बोल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:12
10 Iomraidhean Croise  

अब्राहाम म्हणाला, “पाहा, मी केवळ धूळ व राख असून प्रभूशी बोलण्याचे मी धाडस करत आहे;


तो म्हणाला, “प्रभूला राग न यावा; मी आणखी एकदाच बोलतो. तेथे कदाचित दहाच आढळले तर?” तो म्हणाला, “त्या दहांकरता त्याचा नाश करणार नाही.”


मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, “स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी; आपला राग आपल्या दासावर भडकू नये; आपण तर फारोसमान आहात.


ती म्हणाली, “महाराजांनी आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण करावे म्हणजे रक्तपाताचा सूड घेणार्‍याला आणखी नासधूस करता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडणार नाही.”


ती स्त्री म्हणाली, “देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजले? महाराज आता जे शब्द बोलले त्यांमुळे ते स्वतःच दोषी ठरतात; कारण महाराज स्वत:च्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत.


तो तिच्याजवळ गेला तेव्हा त्या स्त्रीने विचारले, “यवाब तो तूच काय?” तो म्हणाला, “होय, मीच तो.” मग ती त्याला म्हणाली, “तुझ्या दासीचे म्हणणे ऐक.” तो म्हणाला, “सांग, मी ऐकतो.”


मग तो म्हणाला “मला तुझ्याशी काही बोलायचे आहे.” ती म्हणाली, “बोल.”


हे परमेश्वरा, मी तुझ्याशी वाद घालू लागलो तर तू न्यायीच ठरशील; तरी मी तुझ्याशी असा वाद करतो की दुष्टांचा मार्ग का सफल होतो? बेइमानी करणार्‍या सर्वांना सुखसमाधान का प्राप्त होते?


मग अग्रिप्पाने पौलाला म्हटले, “तुला स्वतःच्या तर्फे बोलण्यास परवानगी आहे. तेव्हा पौलाने हात पुढे करून प्रत्युत्तर केले :


ती त्याच्या पाया पडून म्हणाली, “अहो माझे स्वामी, हा अपराध माझ्याच शिरी असू द्या. आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या; आपल्या दासीचे बोलणे ऐका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan