Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 14:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ती म्हणाली, “महाराजांनी आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण करावे म्हणजे रक्तपाताचा सूड घेणार्‍याला आणखी नासधूस करता येणार नाही आणि माझ्या पुत्राचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, तुझ्या पुत्राचा एक केसही भूमीवर पडणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 ती तकोवा येथील स्त्री पुन्हा राजाला म्हणाली, परमेश्वर देवाच्या नावाची शपथ वाहून सांगा की, या लोकांचा तुम्ही बंदोबस्त कराल. त्यांना भावाचा खून केल्याबद्दल माझ्या मुलाला शासन करायचे आहे. तेव्हा त्यास धक्का पोहचणार नाही याचे मला आश्वासन द्या. दावीद म्हणाला, परमेश्वर जिवंत असेपर्यंत कोणीही तुझ्या पुत्राला इजा करणार नाही. त्याच्या केसालाही धक्का पोचणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ती म्हणाली, “तर मग राजाने याहवेह आपल्या परमेश्वराला विनंती करावी, म्हणजे रक्ताचा सूड घेणार्‍याला हानी करण्यापासून प्रतिबंध करावा, म्हणजे माझ्या मुलाचा नाश होणार नाही.” तो म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, तुझ्या मुलाच्या डोक्यावरील एक केसही जमिनीवर पडणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 14:11
18 Iomraidhean Croise  

पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,


तू माझ्या मुलींना दु:ख दिले किंवा त्यांखेरीज अन्य स्त्रिया केल्यास तर पाहा; तुझ्यामाझ्यामध्ये कोणी मानव नसला तरी देव साक्षी आहे.”


राजा म्हणाला, “तुला कोणी काही बोलले तर त्याला माझ्याकडे घेऊन ये, म्हणजे तो पुन्हा तुला हातही लावणार नाही.”


ती म्हणाली, “आपल्या दासीला स्वामीराजांशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी.” तो म्हणाला, “बोल.”


मग राजाने यवाबाला म्हटले, “मला हे कबूल आहे; तर जाऊन त्या तरुण अबशालोमास माघारी घेऊन ये.”


शलमोन म्हणाला, “तो भला मनुष्य आहे असे दिसल्यास त्याचा एक केसही जमिनीवर पडणार नाही, पण त्याच्या ठायी दुष्टता दिसून आली तर तो प्राणाला मुकेल.”


आणि सत्याने, न्यायाने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाहशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणांस धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील.”


रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने स्वत: त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; तो सापडेल तेथे त्याने त्याला जिवे मारावे.


अथवा कोणी वैरभावाने त्याला ठोसा मारल्यामुळे तो मेला, तर मारणार्‍याला अवश्य जिवे मारावे; तो खुनी होय; रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने खुनी सापडेल तेथे त्याला जिवे मारावे.


आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने त्या शरणपुराच्या सीमेबाहेर त्याला गाठले, आणि रक्तपाताबद्दल सूड घेणार्‍याने त्याला जिवे मारले तर त्या रक्तपाताचा दोष त्याला लागायचा नाही.


तुमच्या डोक्यावरील सर्व केसदेखील मोजलेले आहेत.


म्हणून मी तुम्हांला विनंती करतो की, अन्न खा; त्याच्याने तुमचा निभाव लागेल; कारण तुमच्यापैकी कोणाच्या डोक्याच्या केसाचादेखील नाश होणार नाही.”


तेव्हा लोक शौलाला म्हणाले, “ज्याने इस्राएलाचा एवढा उद्धार केला तो योनाथान मरणार काय? असे कदापि होणे नाही; परमेश्वराच्या जीविताची शपथ, त्याच्या डोक्यावरचा एक केसही भूमीवर पडता कामा नये, कारण त्याने आज परमेश्वराच्या पक्षाने कामगिरी केली आहे.” ह्या प्रकारे लोकांनी योनाथानाचा बचाव केला, तो मेला नाही.


तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.


शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ह्या बाबतीत तुला काहीएक दंड होणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan