Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 योनादाब त्याला म्हणाला, “तू आपल्या पलंगावर निजून आजार्‍याचे मिष कर, व तुझा पिता तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्याला सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न भरवावे, तिने ते अन्न माझ्यादेखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 योनादाब यावर अम्नोनाला म्हणाला, आता तू आजारी पडल्याचे सोंग कर आणि झोपून जा. मग वडील भेटायला आले की त्यांना सांग, तामारला माझ्याकडे येऊ द्या. तिने मला खायला घालू द्या. माझ्या समोरच तिला एखादा खाद्य पदार्थ तयार करू द्या. मग तो तिच्या हातून मी खाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:5
8 Iomraidhean Croise  

तो अम्नोनाला म्हणाला, “राजकुमारा, तू दिवसानुदिवस असा क्षीण का होत चालला आहेस? मला नाही का सांगणार?” अम्नोनाने त्याला उत्तर दिले, “माझा बंधू अबशालोम ह्याची बहीण तामार हिच्यावर माझे मन बसले आहे.”


मग अम्नोनाने अंथरुणावर पडून आजार्‍याचे सोंग केले; राजा त्याच्या समाचाराला गेला तेव्हा अम्नोन राजाला म्हणाला, “एवढे करा; माझी बहीण तामार हिने माझ्याकडे येऊन दोन पोळ्या माझ्यादेखत तयार कराव्यात, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”


अहीथोफेलाने अबशालोमाला म्हटले, “ज्या उपपत्नी तुझा पिता मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा; तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्राएल लोक ऐकतील तेव्हा तुझ्याबरोबरच्या सर्वांच्या हातांना जोर येईल.”


माझ्या मुला, ज्ञानाची वचने सोडून भटकायचे असले तर शिक्षण घेणे सोडून दे.


तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करायची आहे, ह्या निमित्ताने त्याला आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेसहित सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan