२ शमुवेल 13:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 तेव्हा दाविदाचा भाऊ शिमा ह्याचा पुत्र योनादाब म्हणाला, “माझे स्वामी, सर्व राजपुत्र मरण पावले अशी कल्पना महाराजांनी मनात आणू नये; केवळ अम्नोनाचा वध झाला आहे; कारण ज्या दिवशी त्याने अबशालोमाची बहीण तामार भ्रष्ट केली त्या दिवशी त्याच्या संकल्पाने ही गोष्ट निश्चित झाली होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 परंतु दावीदाचा भाऊ शिमा याचा मुलगा योनादाब राजाला म्हणाला, सर्व मुले गेली असे समजू नका. फक्त अम्नोन मरण पावला आहे. अम्नोनाने तामार या आपल्या बहिणीवर बलात्कार केला तेव्हा पासूनच अबशालोमच्या डोक्यात ही योजना तयार होत होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 परंतु दावीदाचा भाऊ शिमिआह याचा पुत्र योनादाब म्हणाला “सर्वच राजपुत्रांना मारून टाकले आहे असा माझ्या धन्याने विचार करू नये; केवळ अम्नोन मरण पावला आहे. कारण अम्नोनाने त्याची बहीण तामार हिच्यावर बलात्कार केला होता, तेव्हापासून अबशालोमाने हा निश्चय केला होता. Faic an caibideil |