Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 हे ऐकून दाविदाने उठून आपली वस्त्रे फाडली व जमिनीवर अंग टाकले; त्याचे सर्व सेवकही आपली वस्त्रे फाडून त्याच्याजवळ उभे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 राजा दु:खाने आपले कपडे फाडून जमिनीवर पडून राहिला. राजाच्या जवळ असणाऱ्या इतर अधिकाऱ्यांनीही आपली वस्त्रे फाडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 तेव्हा राजा उभा राहिला, आपली वस्त्रे फाडली आणि जमिनीवर पडून राहिला; आणि त्याचे सर्व सेवक त्यांची वस्त्रे फाडून राजाच्या बाजूला उभे राहिले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:31
8 Iomraidhean Croise  

रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.


हे ऐकून दाविदाने आपली वस्त्रे धरून फाडली आणि जितके लोक त्याच्याबरोबर होते त्यांनीही तसेच केले.


म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकळूत करू लागला. त्याने उपास केला व आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला.


ते वाट चालत असताना दाविदाला अशी खबर आली की, “अबशालोमाने सर्व राजकुमार मारून टाकले, त्यांतला एकही उरला नाही.”


मग दावीद यवाबाला व आपल्याबरोबरच्या सर्व लोकांना म्हणाला, “आपली वस्त्रे फाडा आणि गोणपाट नेसून अबनेरापुढे शोक करत चाला.” दावीद राजा स्वतः त्याच्या तिरडीमागे चालला.


मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले.


तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan