Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 अबशालोमाने आपल्या सर्व सेवकांना अशी ताकीद देऊन ठेवली होती की, “सावध राहा, अम्नोन द्राक्षारस पिऊन रंगात आला म्हणजे मी तुम्हांला इशारा केल्याबरोबर तुम्ही अम्नोनावर प्रहार करून त्याला ठार करा, काही भिऊ नका; मी तुम्हांला हुकूम करतो आहे ना? हिंमत धरा, शौर्य दाखवा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 अबशालोमने आपल्या नोकरांना आज्ञा दिली. तो म्हणाला, अम्नोनावर नजर ठेवा. मद्याचा आनंद घेत त्यास जेव्हा त्याची नशा चढेल, तेव्हा मी तुम्हास संकेत करीन. मग त्याच्यावर हल्ला करून तुम्ही त्यास ठार करा शिक्षेची भीती बाळगू नका. अखेर तुम्ही माझ्या आज्ञेचे पालन करत आहात. धैर्याने आणि खंबीरपणाने वागा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 अबशालोमाने त्याच्या माणसांना आज्ञा केली, “ऐका! जेव्हा अम्नोन द्राक्षारस पिऊन मस्त झालेला असेल आणि मी तुम्हाला सांगेन, ‘अम्नोनावर वार करा,’ तेव्हा त्याला ठार मारा. घाबरू नका. ही आज्ञा मी तुम्हाला केली नाही काय? खंबीर व्हा आणि धैर्य धरा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:28
30 Iomraidhean Croise  

तो द्राक्षारस पिऊन गुंगला आणि आपल्या डेर्‍यात उघडानागडा पडला.


दाविदाने बोलावल्यावरून त्याने येऊन त्याच्यासमोर खाणेपिणे केले व त्याला त्याने दारू पाजून मस्त केले. संध्याकाळ झाली तेव्हा तो आपल्या स्वामीच्या सेवकांबरोबर आपल्या खाटेवर निजायला गेला, पण घरी गेला नाही.


त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”


तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस.


अबशालोमाने त्याला एवढा आग्रह केला की त्याने अम्नोनास व सर्व राजकुमारांना त्याच्याबरोबर जाऊ दिले.


आपल्या दासीचे दोन पुत्र होते, ते दोघे मैदानात झगडत असताना त्यांना सोडवायला कोणी नव्हता; तेव्हा एकाने दुसर्‍याला असा मार दिला की तो ठार झाला.


ते भर दोन प्रहरी चाल करून गेले. त्या प्रसंगी बेन-हदाद व त्याच्या कुमकेस आलेले बत्तीस राजे डेर्‍यांमध्ये पिऊन मस्त होत होते.


सातव्या दिवशी द्राक्षारसाने राजाचे मन उल्लासयुक्त झाले असता त्याने महूमान, बिगथा, हरबोना, बिग्था, अवगथा, जेरथ, कर्खस असे जे सात खोजे त्याच्या तैनातीस असत त्यांना आज्ञा केली की,


म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी.


तेव्हा मिसरी राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही हे का केले? मुलगे का जिवंत राहू दिले?”


ख्यालीखुशालीसाठी मेजवानी करतात; द्राक्षारस जिवास उल्लास देतो; पैशाने सर्वकाही साध्य होते.


जा, तू आनंदाने आपली भाकर खा; हर्षभराने आपला द्राक्षारस पी; कारण देवाचा तुझ्या कृत्यांवर प्रसाद झाला आहे.


त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला.


ते गुंतागुंत झालेल्या काटेर्‍यांसारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्यांप्रमाणे असले, तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील.


तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;


परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.


मी तुला आज्ञा केली आहे ना? खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस; कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


मग त्या दोघांनी बसून न्याहारी केली. मग मुलीचा बाप जावयाला म्हणाला, “कृपया आज खुशीने येथे राहा आणि आणखी एक रात्र मजेत घालवा.”


मग जावई आपली उपपत्नी व सेवक ह्यांच्यासह जायला निघाला, तेव्हा मुलीचा बाप म्हणजे त्याचा सासरा त्याला म्हणाला, “संध्याकाळ होत चालली आहे तुम्ही कृपया रात्री येथेच राहा. दिवस सरत आला आहे; येथेच आनंदात राहा. उद्या सकाळी पहाटेस उठून मार्गस्थ व्हा व आपल्या घरी जा.”


खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला; मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजली.


शौलाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की, “दाविदाला आतून असे म्हणा की ’राजा तुझ्यावर प्रसन्न आहे; त्याचे सर्व सेवक तुझ्यावर प्रेम करतात, तर आता तू राजाचा जावई हो.”’


शौलाने परमेश्वराची शपथ घेऊन तिला म्हटले, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ह्या बाबतीत तुला काहीएक दंड होणार नाही.”


राजाने तिला म्हटले, “भिऊ नकोस, तुला काय दिसते?” ती शौलाला म्हणाली, “कोणी दैवत पृथ्वीतून वर येताना दिसत आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan