Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 13:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 ती म्हणाली, “माझ्या बंधो, छे, माझ्यावर बलात्कार करू नकोस, इस्राएलात असे कुकर्म करू नये; असला मूर्खपणा तू करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तामार त्यास म्हणाली, भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करू नकोस. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 ती त्याला म्हणाली, “नाही, माझ्या भावा! माझ्यावर जबरदस्ती करू नकोस! इस्राएलमध्ये अशी गोष्ट होऊ नये! अशी घृणास्पद गोष्ट करू नकोस.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 13:12
12 Iomraidhean Croise  

तेव्हा त्या देशाचा अधिपती हमोर नावाचा हिव्वी ह्याचा मुलगा शखेम ह्याची नजर तिच्यावर गेली. तो तिला घेऊन गेला आणि तिच्यापाशी निजून त्याने तिला भ्रष्ट केले.


ते वर्तमान ऐकून याकोबाचे मुलगे रानातून घरी आले; शखेमाने करू नये ते केले म्हणजे याकोबाच्या मुलीपाशी निजून त्याने इस्राएलाशी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना मनस्वी दु:ख होऊन ते फार संतापले.


भोळ्या मंडळीत तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला.


कारण त्यांनी इस्राएलात मूर्खपणा केला आहे, त्यांनी आपल्या शेजार्‍यांच्या बायकांबरोबर जारकर्म केले आहे, मी त्यांना आज्ञापली नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाम घेऊन सांगितली; मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’


तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून झालेली मुलगी तुझी बहीणच आहे म्हणून तिची काया उघडी करू नकोस.


आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नकोस.


कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो अथवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करून घेऊन तिची काया पाहील व ती त्याची काया पाहील तर हा निंद्य प्रकार होय; त्यांच्या भाऊबंदांच्या देखत त्या दोघांचा उच्छेद करावा. त्याने आपल्या दुष्कर्माबद्दलची शिक्षा भोगावी.


वडीलवर्गाने त्या मुलीला तिच्या बापाच्या घराबाहेर काढावे आणि गावच्या पुरुषांनी तिला मरेपर्यंत दगडमार करावा; कारण तिने आपल्या बापाच्या घरी वेश्याकर्म करून इस्राएलात भ्रष्टाचार केला आहे; ह्याप्रमाणे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे.


तर तिच्याशी गमन करणार्‍या पुरुषाने मुलीच्या बापाला पन्नास शेकेल रुपे द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी; कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करता कामा नये.


घरधनी बाहेर जाऊन म्हणू लागला, “छे, छे! बांधवहो, मी हात जोडतो, असले दुष्कर्म करू नका; हा मनुष्य माझा पाहुणा आहे म्हणून असला निर्लज्जपणा करू नका.


तेव्हा मी माझ्या उपपत्नीला घरी आणून तिचे तुकडे केले आणि इस्राएलाच्या वतनांतील सर्व प्रांतात पाठवून दिले; कारण त्या लोकांनी इस्राएलामध्ये कामांध व निर्लज्ज कृत्य केले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan