Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 12:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 नाथान दाविदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस. इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले व तुला शौलाच्या हातातून सोडवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, तूच तो मनुष्य आहेस. इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो, इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला, तुला शौलापासून वाचवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तेव्हा नाथान दावीदाला म्हणाला, “तो मनुष्य तूच आहेस! याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘मी तुझा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला आणि तुला शौलाच्या हातातून सोडविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 12:7
22 Iomraidhean Croise  

ती स्त्री म्हणाली, “देवाच्या प्रजेचे नुकसान करण्याचे आपण हे काय योजले? महाराज आता जे शब्द बोलले त्यांमुळे ते स्वतःच दोषी ठरतात; कारण महाराज स्वत:च्या हाकून दिलेल्यास माघारी आणत नाहीत.


परमेश्वराने दाविदाला त्याच्या सर्व शत्रूंपासून व शौलाच्या हातांतून सोडवले त्या समयी त्याने परमेश्वराला हे कवन गाईले.


तोच मला माझ्या वैर्‍यांपासून सोडवतो, माझ्याविरुद्ध उठणार्‍यांवर तू माझे वर्चस्व करतोस, बलात्कारी माणसांपासून मला सोडवतोस.


तर आता माझा सेवक दावीद ह्याला सांग, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, तू माझ्या प्रजेचा, इस्राएलांचा अधिपती व्हावे म्हणून मी तुला मेंढवाड्यातून मेंढराच्या मागे फिरत असताना आणले,


जा, यराबामाला सांग, इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुला लोकांतून निवडून उन्नत केले, माझे लोक इस्राएल ह्यांचा तुला मी नायक नेमले,


तो म्हणाला, “मी इस्राएलास छळले नाही; तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानायचे सोडून बआलमूर्तींच्या नादी लागून इस्राएलास छळले आहे.


आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला.” इस्राएलाच्या राजाने त्याला म्हटले, “तोच तुझा न्याय; तू आपल्याच तोंडाने निर्णय केलास.”


तो राजाला म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिलास तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील.”


हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.


तेव्हा यिर्मया संदेष्ट्याने ही सर्व वचने यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला यरुशलेमेत सांगितली.


महाराज, तो वृक्ष आपणच आहात; आपण वाढून बलवान झाला आहात; आपली थोरवी वाढून गगनापर्यंत पोहचली आहे.


मग येशूने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला; तेव्हा त्यांचा त्याला कळवळा आला व त्यांच्यातील दुखणेकर्‍यांना त्याने बरे केले.


शमुवेल शौलाला म्हणाला, “तू मूर्खपणा केलास, तुझा देव परमेश्वर ह्याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस, मानली असतीस तर परमेश्वराने इस्राएलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते;


शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”


मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्याला अभिषेक केला; आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमुवेल उठून रामास गेला.


शौलाने त्याला मारायला भाला उगारला; तो म्हणाला की, “भाला मारून दाविदाला भिंतीशी खिळावे;” पण दाविदाने त्याच्यासमोरून एकीकडे सरकून त्याला दोनदा चुकवले.


शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”


मग दावीद रानातील गढ्यांमध्ये राहू लागला; तो जीफ नावाच्या रानातील पहाडी प्रदेशात राहिला. शौल त्याचा शोध नित्य करीत असे; पण देवाने त्याला त्याच्या हाती लागू दिले नाही.


दावीद कईला येथे गेला हे कोणी शौलाला कळवले तेव्हा तो म्हणाला, “आता देवाने त्याला माझ्या हाती दिले आहे; कारण दरवाजे व अडसर असलेल्या नगरात जाऊन तो आयताच कोंडला गेला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan