Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 12:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 एकदा त्या श्रीमंताकडे एक पाहुणा आला, तेव्हा त्याच्याकडे आलेल्या त्या पाहुण्यासाठी भोजन तयार करावे म्हणून त्याने आपल्या शेरडामेंढरांतून अथवा गाईबैलांतून एखादे न घेता त्या गरीब माणसाची ती मेंढी घेऊन आपल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 एकदा एक पाहुणा त्या श्रीमंत मनुष्याकडे आला. त्या पाहुण्याला खाऊपिऊ घालायची श्रीमंत मनुष्याची इच्छा होती. पण आपल्या गुरामेंढरांमधून त्यास काही काढून घ्यायचे नव्हते, म्हणून त्याने त्या गरीब मनुष्याची मेंढी घेतली. तिला मारले आणि त्या पाहुण्यासाठी अन्न शिजवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्या श्रीमंत मनुष्याकडे एक पाहुणा आला. परंतु त्या श्रीमंत मनुष्याने त्या पाहुण्यासाठी भोजन बनवावे म्हणून त्याच्याकडील असलेल्या मेंढरे किंवा गुरातून घेतले नाही, त्याऐवजी त्याने त्या गरीब माणसाची ती लहान मेंढी घेऊन त्याच्याकडे आलेल्या पाहुण्यासाठी भोजन तयार केले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 12:4
6 Iomraidhean Croise  

पण त्या गरिबाजवळ एका लहानशा मेंढीखेरीज काहीच नव्हते. त्याने ती विकत घेऊन तिचे संगोपन केले होते; ती त्याच्याबरोबर व त्याच्या मुलाबाळांबरोबर लहानाची मोठी झाली; ती त्याच्या घासातला घास खात असे, त्याच्या प्याल्यातून पाणी पीत असे व त्याच्या उराशी निजत असे; ती त्याची मुलगीच बनली होती.


हे ऐकून त्या माणसावर दाविदाचा कोप भडकला. तो नाथानाला म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, ज्या माणसाने हे काम केले तो प्राणदंडास पात्र आहे;


तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा मोहात पडतो.


त्या म्हातार्‍याने गावातल्या रस्त्यावर नजर टाकली तेव्हा कोणी प्रवासी तेथे बसला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. म्हातार्‍याने त्याला विचारले, “तू कोठे निघालास? तू कोठून आलास?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan