२ शमुवेल 12:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग दावीद जमिनीवरून उठला; त्याने स्नान करून तैलाभ्यंग केला, आपला पोशाख बदलला आणि परमेश्वराच्या मंदिरात जाऊन दंडवत घालून आराधना केली; मग तो आपल्या मंदिरात आला, त्याने सांगितल्यावरून त्याच्या सेवकांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, ते त्याने सेवन केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला त्यांने आंघोळ केली, कपडे बदलून तयार झाला. मग आराधना करण्यासाठी परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्यानंतर घरी जाऊन त्याने खायला मागितले. सेवकांनी त्यास वाढले आणि तो जेवला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा दावीद जमिनीवरून उठला, त्याचे स्नान झाल्यानंतर, तैलाभ्यंग करून आपले कपडे बदलले व याहवेहच्या घरात जाऊन त्याने आराधना केली, मग तो आपल्या स्वतःच्या घरात गेला व त्याने मागितल्यानुसार त्यांनी त्याच्यापुढे अन्न वाढले, आणि त्याने ते खाल्ले. Faic an caibideil |