२ शमुवेल 12:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सातव्या दिवशी ते मूल मेले; पण मूल मेले आहे हे दाविदाला सांगायला त्याच्या चाकरांना भय वाटले; ते म्हणाले, “पाहा, मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजावले पण त्याने ऐकले नाही; तर मूल मरण पावले आहे असे त्याला कळवले तर तो स्वतःला अपाय करून घ्यायचा.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मुलाच्या मृत्यूची बातमी दावीदाला द्यायला त्याचे नोकर कचरु लागले. ते म्हणाले, मुलगा जिवंत असतानाही आम्ही दावीदाशी बोलायला गेलो तरी तो ऐकत नसे, मग आता तर मूल मरण पावले असे आम्ही सांगितले तर तो आपल्या जिवाचे काही बरेवाईट करून घेईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 सातव्या दिवशी ते मूल मरण पावले. मूल मरण पावले आहे हे दावीदाला सांगण्यासाठी त्याचे सेवक घाबरत होते, कारण त्यांना वाटले, “मूल जिवंत असताना आम्ही त्याला समजाविले पण तो आमचे ऐकत नव्हता. तर आता आम्ही त्याला कसे सांगावे की, मूल मरण पावले आहे? तो स्वतःला काही अपाय करून घेईल.” Faic an caibideil |