Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 12:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन; तुझ्या स्त्रिया तुझ्यादेखत तुझ्या शेजार्‍याला देईन; तो ह्या सूर्यादेखत त्यांची अब्रू घेईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 “याहवेह असे म्हणतात: ‘तुझ्याच घराण्यातून मी तुझ्यावर अरिष्ट आणणार आहे. तुझ्या डोळ्यांसमोर मी तुझ्या स्त्रिया घेऊन तुझ्या जिवलगाला देईन आणि तो दिवसाच्या प्रकाशात तुझ्या स्त्रियांशी संबंध ठेवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 12:11
13 Iomraidhean Croise  

अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.”


हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.”


इस्राएलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे; ह्या प्रकारे अबशालोमाने इस्राएल लोकांची मने हरण केली.


मग दाविदाने अबीशय व आपले सर्व सेवक ह्यांना सांगितले, “पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे ह्यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या! कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल.


तर माझी स्त्री दुसर्‍याचे दळणकांडण करो; परके तिला ओणवी करोत.


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


राजाने पुष्कळ बायका करू नयेत नाहीतर त्याचे मन बहकून जाईल, तसेच त्याने स्वतःसाठी सोन्यारुप्याचा फार मोठा साठा करू नये.


तू एखाद्या स्त्रीला मागणी घालशील, पण दुसराच तिचा उपभोग घेईल; तू घर बांधशील पण त्यात राहणार नाहीस; तू द्राक्षमळा लावशील, पण त्याचे फळ तुला मिळणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan