Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 12:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 तर आता तलवार तुझे घर सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ मानून उरीया हित्ती ह्याची स्त्री आपल्या घरात घातली आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या पत्नीचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तर आता, तलवार तुझ्या घराण्याला कधीही सोडणार नाही, कारण तू मला तुच्छ लेखले आणि उरीयाह हिथीची पत्नी तू स्वतःची पत्नी म्हणून घेतली आहेस.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 12:10
16 Iomraidhean Croise  

देव रात्री स्वप्नात येऊन अबीमलेखाला म्हणाला, “तू जी ही स्त्री आणली आहेस तिच्यामुळे तुझा अंत झालाच म्हणून समज, कारण ती नवर्‍याची बायको आहे.”


तेव्हा राजा फार गहिवरला आणि वेशीवरल्या कोठडीत जाऊन रडला; जाता जाता त्याने हे उद्‍गार काढले; “माझ्या पुत्रा अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा अबशालोमा : तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे होते. अरेरे! अबशालोमा! माझ्या पुत्रा! माझ्या पुत्रा!!”


कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरीया हित्ती ह्याच्या प्रकरणाखेरीज तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही.


जो बर्‍याची फेड वाइटाने करतो, त्याच्या घरातून अरिष्ट जाणार नाही.


इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”


तर तुमच्या नाकातून निघेपर्यंत आणि तुम्हांला शिसारी येईपर्यंत तुम्ही ते महिनाभर खात राहाल; कारण तुमच्यामध्ये वसत असलेल्या परमेश्वराचा तुम्ही त्याग करून त्याच्यासमोर असे रडगाणे गाइले की, आम्ही मिसर देशातून निघालो तरी कशाला?”


तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तलवार परत जागच्या जागी घाल, कारण तलवार धरणारे सर्व जण तलवारीने नाश पावतील.


कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसर्‍यावर प्रीती करील; अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसर्‍याला तुच्छ मानील. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही.


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे, तर तुम्हांला आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो.


ह्यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आता परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan