Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 11:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तिचे सुतक संपल्यावर दाविदाने लोक पाठवून तिला आपल्या घरी बोलावून आणून ठेवून घेतले व ती त्याची स्त्री झाली. पुढे तिला पुत्र झाला; पण दाविदाने हे जे कृत्य केले त्यावरून परमेश्वराची त्याच्यावर इतराजी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 काही काळाने तिचे दुःख ओसरल्यावर दावीदाने सेवकाकरवी तिला आपल्याकडे आणले. ती त्याची पत्नी झाली आणि त्याच्या पुत्राला तिने जन्म दिला. पण दावीदाचे हे नीच कृत्य परमेश्वरास पसंत पडले नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 11:27
16 Iomraidhean Croise  

हे त्याचे कृत्य परमेश्वरास दुष्ट वाटल्यावरून त्याने त्यालाही मारून टाकले.


तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


पण मी तुझ्यावर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पाहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे.”


इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.


अहाब एलीयाला म्हणाला, “माझ्या वैर्‍या, तू मला गाठलेस काय?” तो म्हणाला, “होय, मी तुला गाठले आहे, कारण परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते करावे म्हणून तू स्वतःला विकून टाकले आहेस.


ह्या गोष्टीवरून देवाची इतराजी होऊन त्याने इस्राएलावर मारा केला.


असत्य भाषण करणार्‍याचा तू नाश करतोस; खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो.


जो कोणी आपल्या शेजार्‍याच्या स्त्रीशी गमन करतो तो असा आहे; जो कोणी तिला स्पर्श करतो तो निर्दोष असणार नाही.


जे परमेश्वरापासून आपले मनसुबे लपवतात, आपला कारभार अंधारात चालवतात आणि “आम्हांला कोण पाहतो, आमचे कोणाला कळते,” असे म्हणतात, त्यांना धिक्कार असो;


कोणाचा दावा बिघडवणे, असली कृत्ये प्रभू पाहत नाही काय?


आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरीयाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शलमोन झाला;


तर तिच्याशी गमन करणार्‍या पुरुषाने मुलीच्या बापाला पन्नास शेकेल रुपे द्यावे आणि ती त्याची बायको व्हावी; कारण त्याने तिला भ्रष्ट केले आहे. त्याने आमरण तिचा त्याग करता कामा नये.


लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरूण निर्दोष असावे; जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan