२ शमुवेल 11:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख ह्याला कोणी मारले? तेबेसात त्याच्यावर एका बायकोने कोटावरून जात्याची वरची तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेलात?’ तेव्हा त्याला तू एवढेच सांग की, ‘आपला सेवक उरीया हित्ती हाही मृत्यू पावला.”’ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 तेबेसमध्ये यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख याला एका स्त्रीने मारले हे आठवते ना? तिने तटबंदीवरून जात्याची तळी उचलून अबीमलेखवर टाकली. असे असताना हा इतक्या जवळ का गेला? राजा दावीद असे काही म्हणाला, तर त्यास हे ही म्हणावे की, उरीया हित्ती हा तुमचा सेवकही यामध्ये मारला गेला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 यरुब्बशेथचा पुत्र अबीमेलेख याला कोणी मारले? एका स्त्रीने जात्याची तळी भिंतीवरून टाकून तेबेस येथे त्याला मारले नाही काय? तुम्ही त्या भिंतीच्या इतक्या जवळ का गेला?’ जर राजा तुला असे विचारतील, तेव्हा त्यांना सांग, ‘तुमचा सेवक उरीयाह हिथी हा सुद्धा मरण पावला आहे.’ ” Faic an caibideil |