Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 11:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 राब्बा नगरातील लोक यवाब विरूद्ध चालून आले. दावीदाची काही माणसे मारली गेली उरीया हित्ती हा त्यापैकी एक होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जेव्हा त्या शहराची माणसे बाहेर आली आणि त्यांनी योआबाविरुद्ध लढाई केली, तेव्हा दावीदाच्या सैन्यातील काही माणसे युद्धात पडली; व उरीयाह हिथी सुद्धा मारला गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 11:17
5 Iomraidhean Croise  

मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले.


मग यवाबाने जासूद पाठवून दाविदाला युद्धाचा सर्व अहवाल कळवला;


यरुब्बेशेथाचा पुत्र अबीमलेख ह्याला कोणी मारले? तेबेसात त्याच्यावर एका बायकोने कोटावरून जात्याची वरची तळी टाकून त्याचा प्राण घेतला की नाही? तर तुम्ही तटाच्या एवढे जवळ का गेलात?’ तेव्हा त्याला तू एवढेच सांग की, ‘आपला सेवक उरीया हित्ती हाही मृत्यू पावला.”’


तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan