Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 11:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 त्या पत्रात असे लिहिले होते की, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाला ठेवा; आणि त्याला तेथेच सोडून मागे हटा; म्हणजे त्याला मार लागून तो मरेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 त्या पत्रात दावीदाने लिहिले होते, आघाडीवर जेथे तुंबळ युध्द चालले असेल, तेथे उरीयाला पाठवा. त्यास एकट्याला तेथे सोडा, म्हणजे तो युध्दात कामी येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 त्यात त्याने असे लिहिले, “तुंबळ युद्धाच्या तोंडी उरीयाहला ठेवा; आणि त्याच्यापासून मागे या म्हणजे त्याच्यावर वार होईल व तो मरण पावेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 11:15
12 Iomraidhean Croise  

मग यवाबाने नगराची चांगली टेहळणी करून जेथे शूर योद्धे असल्याचे त्याला माहीत होते तेथे उरीयाला नेमले.


मग नगरातील पुरुषांनी बाहेर पडून यवाबाशी युद्ध केले; तेव्हा दाविदाच्या सेवकांपैकी काही कामास आले आणि उरीया हित्ती हाही गतप्राण झाला.


तू परमेश्वराची आज्ञा तुच्छ मानून त्याच्या दृष्टीने वाईट असे हे कृत्य का केलेस? उरीया हित्ती ह्याचा तू तलवारीने घात केला, त्याची बायको आपल्या घरात घातलीस आणि उरीयाचा अम्मोन्यांच्या तलवारीने वध करवलास?


कारण दावीद परमेश्वराच्या दृष्टीने जे योग्य ते करीत असे आणि उरीया हित्ती ह्याच्या प्रकरणाखेरीज तो आपल्या आयुष्यभर परमेश्वराने केलेली कोणतीही आज्ञा सोडून बहकला नाही.


हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.


तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे, तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे; म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील, व निवाडा करशील तेव्हा नि:स्पृह ठरशील.


दुष्कर्माबद्दल शिक्षा तत्काळ होत नाही म्हणून मानवपुत्रांचे मन दुष्कर्म करण्याकडे प्रवृत्त होते.


हृदय सर्वांत कपटी आहे; ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे, त्याचा भेद कोणास समजतो?


परमेश्वरापुढे गाणे गा, परमेश्वराचे स्तवन करा; कारण तो दुष्कर्म्याच्या हातून दीनाचा जीव वाचवतो.


शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.


शौल म्हणाला, “ती त्याला दिली म्हणजे ती त्याला पाशरूप होईल, आणि पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडेल.” ह्यास्तव शौल दाविदाला म्हणाला, “ह्या खेपेस तू अवश्य माझा जावई होणार.”


तेव्हा शौल म्हणाला, “तुम्ही दाविदाला जाऊन सांगा की, राजाला हुंडा नको; मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा हव्या आहेत.” शौलाचा ह्यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan