२ शमुवेल 11:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 उरीया दाविदाला म्हणाला, “कोश, इस्राएल व यहूदा मांडवात राहत आहेत आणि माझा धनी यवाब व माझ्या धन्याचे सेवक खुल्या मैदानात तळ देऊन आहेत; असे असताना मी घरी जाऊन खाऊपिऊ आणि आपल्या स्त्रीबरोबर निजू काय? आपल्या जीविताची शपथ, आपल्या प्राणाची शपथ, मी असले काम करणार नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 उरीया दावीदाला म्हणाला, पवित्र कराराचा कोश, इस्राएलचे सैनिक, आणि यहूदा हे राहुट्यांमध्ये राहत आहेत. माझा धनी यवाब आणि महाराजांचे (दावीदाचे) सेवक ही खुल्या मैदानात तळ देऊन आहेत. अशावेळी मीच तेवढे घरी जाऊन खाणेपिणे करणे आणि पत्नीच्या सहवासात झोपणे योग्य होणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 उरीयाह दावीदाला म्हणाला, “कोश आणि इस्राएल आणि यहूदीया हे तंबूत राहत आहेत आणि माझा सेनापती योआब आणि माझ्या धन्याची माणसे उघड्या मैदानात तळ देऊन आहेत. तर मी माझ्या घरी जाऊन खाणेपिणे आणि माझ्या पत्नीशी प्रेम कसे करू शकतो? तुमच्या जिवाची शपथ, मी अशी गोष्ट करणार नाही!” Faic an caibideil |