२ शमुवेल 10:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या वेळी अम्मोनी लोकांचे सरदार आपला स्वामी हानून ह्याला म्हणाले की, “दाविदाने आपले सांत्वन करण्यासाठी लोक पाठवले आहेत ते आपल्या बापाविषयीची आदरबुद्धी दर्शवण्याकरता पाठवले आहेत असे आपल्याला वाटते काय? ह्या नगराची पाहणी व टेहळणी करून त्याचा विध्वंस करावा म्हणून दाविदाने आपले चाकर पाठवले आहेत; नाही काय?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण अम्मोनी अधिकारी त्यांचा स्वामी हानून याला म्हणाले, तुमच्या सांत्वनेसाठी माणसे पाठवून दावीद तुमच्या वडीलांचा मान राखतोय असे तुम्हास वाटते का? उलट गुप्तपणे तुमच्या प्रांतातील खबर काढायला त्याने या लोकांस पाठवले आहे. त्यांचा तुझ्याविरूद्ध उठाव करायचा बेत आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा अम्मोनी अधिकार्यांनी त्यांचा धनी हानून याला विचारले, “दावीदाने सहानुभूती व्यक्त करण्यासाठी राजदूत पाठवून आपल्या पित्याचा आदर केला आहे असे आपणास वाटते काय? दावीदाने त्यांना आपणाकडे केवळ शहराची पहाणी करण्यास, ते हेरण्यास व ते उद्ध्वस्त करण्यास पाठवले नाही काय?” Faic an caibideil |