Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 माझ्या बंधो, योनाथाना, मी तुझ्याकरिता विव्हळ होत आहे. तू माझ्यावर फार माया करत असायचास. तुझे माझ्यावर विलक्षण प्रेम होते, स्त्रियांच्या प्रेमाहूनही ते अधिक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 बंधू योनाथान, मी अतिशय दुःखी असून तुझ्यासाठी फार अस्वस्थ आहे. तुझ्या सहवासाचा लाभ मला मिळाला. स्त्रियांच्या प्रेमापेक्षाही तुझे माझ्यावरील प्रेम अधिक होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 योनाथान माझ्या भावा, मी तुझ्यासाठी शोक करतो; तू मला फार प्रिय होतास. माझ्यावरील तुझे प्रेम अद्भुत असे होते, स्त्रीच्या प्रेमापेक्षा ते अधिक अद्भुत होते!

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:26
7 Iomraidhean Croise  

बलाढ्य पाहा कसे पतन पावले आहेत! युद्धाची शस्त्रे कशी नाश पावली आहेत!”


जो पुष्कळ मित्र मिळवतो तो आपला नाश करून घेतो, परंतु एखादा असा मित्र असतो की तो आपल्या बंधूपेक्षाही आपणांस धरून राहतो.


म्हणून योनाथानाने दाविदाला सागितले की, “माझा बाप शौल तुला मारून टाकायला पाहत आहे; तर तू सकाळपर्यंत सावध होऊन एखाद्या गुप्त स्थळी लपून राहा.


योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता.


तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.


तेव्हा शौलाचा पुत्र योनाथान हा निघून दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला व देवाच्या ठायी त्याचा भरवसा दृढ करून त्याच्या हाताला त्याने बळकटी दिली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan