Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 शौल आणि योनाथान यांनी आयुष्यभर परस्परांवर प्रेम केले. एकमेकांना आनंद दिला मृत्यूनेही त्यांची ताटातूट केली नाही. गरुडांहून ते वेगवान आणि सिंहापेक्षा बलवान् होते!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 शौल आणि योनाथान, जिवंत असता प्रिय व आवडते होते, मृत्यूमध्येही त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडांपेक्षा वेगवान होते, सिंहांपेक्षा बलवान असे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:23
14 Iomraidhean Croise  

इस्राएली कन्यांनो, शौलासाठी रुदन करा; तो तुम्हांला किरमिजी वस्त्रे लेववून शृंगारित असे; तो तुमच्या वस्त्रांवर सोन्याचे अलंकार घालीत असे.


सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.


कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.


दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


ते वेगवान तारवांसारखे,2 आपल्या भक्ष्यावर झडप घालणार्‍या गरुडासारखे निघून जात आहेत.


ते हे : सर्व वनपशूंत बलवान व कोणालाही पाठ न दाखवणारा सिंह;


त्याची वाणी परम मधुर आहे; तो सर्वस्वी मनोहर आहे. यरुशलेमाच्या कन्यांनो, माझा वल्लभ, माझा सखा, असा आहे!


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


आमचा छळ करणारे आकाशातील गरुडांपेक्षा चपल होते; त्यांनी डोंगरावर आमची पाठ पुरवली, रानात आमच्यासाठी दबा धरला.


दुरून, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र परमेश्वर तुझ्यावर आणील; त्याची भाषा तुला समजणार नाही;


सातव्या दिवशी तो शय्यागृहात शिरण्यापूर्वी नगरवासी त्याला म्हणाले, “मधापेक्षा गोड ते काय? आणि सिंहापेक्षा उग्र ते काय?” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्या कालवडीला नांगरास जुंपले नसते तर तुम्हांला माझे कोडे कधीच उलगडले नसते.”


दाविदाचे शौलाशी भाषण संपले तेव्हा योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला.


तो त्याला म्हणाला, “असे कधी न घडो; तू मारला जाणार नाहीस; माझा बाप लहानमोठे कोणतेही काम मला सांगितल्यावाचून करीत नाही; तर एवढीच गोष्ट माझ्यापासून तो का गुप्त ठेवील? असे मुळीच होणे नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan