Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला. शौलाची ढाल तेल-पाण्यावाचून तशीच पडली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 “गिलबोआच्या डोंगरांनो, तुम्हावर दव किंवा पाऊस न येवो; तुमच्या उतरणीच्या शेतांवर पावसाच्या सरी न पडोत. कारण तिथे शूरवीराची ढाल तिरस्कृत झाली, शौलाची ढाल—यापुढे तेलाने पुसली जाणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:21
14 Iomraidhean Croise  

पलिष्टी इस्राएलाशी लढले तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.


दुसर्‍या दिवशी पलिष्टी लोक वधलेल्यांना लुटायला आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.


तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधलेल्या बुरुजासारखी आहे, त्यावर सहस्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात.


ते मेजवानीची तयारी करतात; ते पहारेकरी ठेवतात; खातातपितात; सरदारहो, उठा, ढालीस तेल लावा.


मी तो उद्ध्वस्त करीन; त्याला कोणी खच्ची करणार नाही व कुदळणार नाही; त्यात काटेसराटे उगवतील; त्यावर पाऊस पाडू नका अशी आज्ञा मी मेघांना करीन.


प्रभू परमेश्वर म्हणतो, ज्या दिवशी तो अधोलोकी गेला त्या दिवशी मी विलाप करवला; त्याच्यासाठी मी जलनिधी झाकला, त्याचे प्रवाह बंद केले, महाजले रोखली; त्याच्यासाठी मी लबानोनास काळेठिक्कर केले. त्याच्यासाठी वनातले सर्व वृक्ष म्लानवदन झाले.


परमेश्वराच्या मंदिरात अन्नार्पण व पेयार्पण येण्याचे बंद झाले आहे; परमेश्वराची सेवा करणारे याजक शोक करत आहेत.


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या. त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या; कारण परमेश्वराला साहाय्य करायला, वीरांविरुद्ध परमेश्वराला साहाय्य करायला ते आले नाहीत.


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


पलिष्टी इस्राएलाशी लढले; तेव्हा इस्राएल लोक पलिष्ट्यांपुढून पळून गेले व गिलबोवा डोंगरात घायाळ होऊन पडले.


दुसर्‍या दिवशी मारलेल्या लोकांना नागवण्यास पलिष्टी आले तेव्हा शौल व त्याचे तिघे पुत्र गिलबोवा डोंगरात पडलेले त्यांना आढळले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan