Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ह्यानंतर तिसर्‍या दिवशी छावणीतून शौल होता तेथून एक माणूस आला; त्याने आपले कपडे फाडले होते व डोक्यात धूळ घातली होती. तो दाविदाजवळ येऊन पोहचल्यावर त्याने त्याला साष्टांग दंडवत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तिसऱ्या दिवशी, तेथे एक तरुण सैनिक आला. तो शौलाच्या छावणीतील होता. त्याचे कपडे फाटलेले आणि डोके धुळीने माखलेले होते. त्याने सरळ दावीदाजवळ येऊन लोटांगण घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तिसर्‍या दिवशी शौलाच्या छावणीतून एक मनुष्य आला, त्याचे कपडे फाटलेले होते आणि डोक्यावर धूळ घातलेली होती. तेव्हा तो दावीदाकडे आला आणि जमिनीवर पालथा पडून दंडवत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 1:2
25 Iomraidhean Croise  

तिसर्‍या दिवशी अब्राहामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली.


रऊबेन खड्ड्याकडे परत येऊन पाहतो तर योसेफ खाड्ड्यात नाही, म्हणून त्याने आपली वस्त्रे फाडली.


तेव्हा याकोबाने आपली वस्त्रे फाडून कंबरेस गोणपाट गुंडाळले आणि आपल्या मुलासाठी पुष्कळ दिवस शोक केला.


ते म्हणाले, “आपला दास, आमचा पिता सुखरूप आहे, तो अजून जिवंत आहे.” त्यांनी लवून त्याला मुजरा केला.


दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.”


तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.


तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”


डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.


तेव्हा अरवना खाली नजर करून पाहतो तर दावीद आपल्या सेवकांसह आपल्याकडे येत आहे असे त्याच्या दृष्टीस पडले, आणि त्याने बाहेर येऊन राजापुढे भूमीपर्यंत लवून प्रणाम केला.


आपण चांगले वर्तमान आणले आहे अशा समजुतीने एकाने मला शौलाच्या मरणाची बातमी दिली; तेव्हा मी सिकलाग येथे त्याला धरून वधले; बातमी आणल्याचे हे बक्षीस मी त्याला दिले.


“जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरता उपास करा; तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासींसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आत राजाकडे जाईन; मग मी मेले तर मेले.”


तिसर्‍या दिवशी एस्तेर राणी आपली राजकीय वस्त्रे धारण करून राजमंदिराच्या आतल्या चौकात जाऊन राजमंदिरासमोर उभी राहिली; राजा राजमंदिरात सिंहासनावर राजद्वारासमोर बसला होता.


देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.


ते तुझ्या स्थितीमुळे लांब हेल काढून मोठ्या दुःखाने रडत आहेत; ते आपल्या डोक्यात धूळ घालत आहेत आणि धुळीत लोळत आहेत.


तो दोन दिवसांत आमचे पुनरुज्जीवन करील; तिसर्‍या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील; आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू.


आपली वस्त्रे नव्हे, तर हृदये फाडा आणि परमेश्वर तुमचा देव ह्याच्याकडे वळा, कारण तो कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे; अरिष्ट आणल्याबद्दल त्याला वाईट वाटण्यासारखे आहे.


कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.


तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की, “मी यरुशलेमेस जाऊन वडील, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी, जिवे मारले जावे व तिसर्‍या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे.”


तेव्हा यहोशवाने आपले कपडे फाडले, आणि तो व इस्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यंत परमेश्वराच्या कोशापुढे पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यात धूळ घातली.


पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणांला यहूदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात; त्यांच्यापैकी कित्येकांना मी तुझ्या स्वाधीन करीन. पाहा, ते ‘येऊन तुझ्या पायांजवळ तुला नमन करतील’ व ‘मी तुझ्यावर प्रीती केली आहे’ हे त्यांना कळून येईल, असे मी करीन.


तो पोरगा निघून जाताच दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणाकडून उठून आला व त्याने भूमीवर उपडे पडून तीनदा नमन केले; मग एकमेकांचे चुंबन घेऊन ते रडू लागले; दावीद तर मनस्वी रडला.


अबीगईल दाविदाला पाहून झटकन गाढवावरून उतरली व दाविदापुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले.


त्याच दिवशी एक बन्यामिनी मनुष्य सैन्यातून पळ काढून शिलो येथे आला; त्याने आपली वस्त्रे फाडली होती व डोक्यात धूळ घातली होती.


तो मनुष्य एलीला म्हणाला, “सैन्यातून आलेला मनुष्य तो मीच; मी आज सैन्यातून पळून आलो आहे.” तेव्हा तो त्याला म्हणाला, “मुला, काय समाचार आहे?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan