Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 3:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तर प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 परंतु प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 प्रिय मित्रांनो, तुम्हाला आधी इशारा देऊन ठेवला आहे, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या चुकीच्या प्रवाहात सापडून आपल्या सुरक्षित स्थितीतून ढळू नये यासाठी जपून राहा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 3:17
26 Iomraidhean Croise  

एखाद्या पक्ष्याच्या डोळ्यांदेखत, जाळे पसरणे व्यर्थ होय.


मी भाकरीविषयी बोललो नाही हे तुम्ही का समजत नाही? परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी सावध राहा.”


तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “परूशी व सदूकी ह्यांच्या खमिराविषयी जपून राहा व सावध असा.”


खोट्या संदेष्ट्यांविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेषाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत.


मी तुम्हांला ह्या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, त्या घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हांला सांगितल्या होत्या ह्याची तुम्हांला आठवण व्हावी. ह्या गोष्टी मी प्रारंभापासून तुम्हांला सांगितल्या नाहीत; कारण मी तुमच्याबरोबर होतो.


ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत.


कारण तसले लोक आपल्या प्रभू ख्रिस्ताची सेवा करत नाहीत, तर स्वत:च्या पोटाची सेवा करतात; आणि गोड व लाघवी भाषणाने भोळ्याभाबड्यांची अंत:करणे भुलवतात.


म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.


म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.2


तरी जसे ‘सापाने कपट करून’ हव्वेला ‘ठकवले’ तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता ह्यांपासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे.


जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे; तुम्ही कृपेला अंतरला आहात.


ह्यासाठी की, आपण ह्यापुढे बाळांसारखे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणार्‍या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वार्‍याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये.


त्या कुत्र्यांविषयी सावध असा; त्या दुष्कर्म्यांविषयी सावध असा; केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध असा.


तरी आत्म्याने तुमच्याजवळ आहे, आणि तुमचा व्यवस्थितपणा व ख्रिस्तावरील तुमच्या विश्वासाचा स्थिरपणा पाहत असून आनंद करत आहे.


ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्त्वज्ञान व पोकळ भुलथापा ह्यांच्या योगाने तुम्हांला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या;


त्याच्याविषयी तूही जपून राहा, कारण तो आमच्या बोलण्यास फार आडवा आला होता.


कारण जर आपण आपला आरंभीचा भरवसा शेवटपर्यंत दृढ धरला तरच आपण ख्रिस्ताचे भागीदार झालो आहोत.


त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा; कारण तुम्हांला माहीत आहे की, जगातील तुमच्या बंधुवर्गाला अशीच दु:खे भोगावी लागत आहेत.


आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली;


प्रियजनहो, आता हे दुसरे पत्र मी तुम्हांला लिहीत आहे; ह्या दोन्हींमध्ये मी तुम्हांला आठवण देऊन तुमचे निर्मळ मन जागृत करत आहे;


म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्‍चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर; तू पश्‍चात्ताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन, आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan