Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 आणि आपल्या प्रभूची सहनशीलता तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हांला असेच लिहिले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 3:15
27 Iomraidhean Croise  

म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो; मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो; तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही.


राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.


देवाने शलमोनाला अलोट शहाणपण व बुद्धी दिली आणि समुद्रकाठच्या वाळूसारखे विशाल मन दिले.


हे एज्रा, तुला तुझ्या देवाने ज्ञान दिले त्याच्या योगे शास्ते व न्यायाधीश ह्यांची नेमणूक कर; तुझ्या देवाचे नियमशास्त्र जाणणार्‍या अशा त्या महानदाच्या पश्‍चिमेकडील सर्व रहिवाशांचा त्यांनी न्यायनिवाडा करावा आणि त्यासंबंधाने जे अज्ञानी आहेत त्यांना तुम्ही शिकवावे.


मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.


आणि पाहा, त्याच्या जोडीला मी दानवंशीय अहिसामाकाचा मुलगा अहलियाब ह्याला नेमले आहे; एवढेच नव्हे तर जितके म्हणून बुद्धिमान आहेत त्या सर्वांच्या ह्रदयात मी बुद्धी ठेवली आहे; ती ह्यासाठी की, तुला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्यांनी तयार कराव्यात.


आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे;


कोरीव काम करणारे कुशल कारागीर, निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या व सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारे, विणकाम करणारे, सर्व तर्‍हेचे कसबी काम करणारे, कुशल कामाची योजना करणारे अशासारख्यांची सर्व कारागिरीची कामे करण्यासाठी त्याने ह्या दोघांचे मन ज्ञानाने परिपूर्ण केले आहे.


जो देवाच्या दृष्टीने चांगला त्याला तो बुद्धी, ज्ञान व सुख देतो; धन मिळवून साठवण्याचे कष्ट देव पाप्यावर लादतो, अशासाठी की, देवाच्या दृष्टीने जो चांगला त्याला ते द्यावे; हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय.


ह्यामुळे परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न होण्यास विलंब लावील; तुमच्यावर करुणा करावी म्हणून उच्च स्थानी आरूढ होईल. परमेश्वर न्यायी देव आहे; जे त्याची वाट पाहतात ते सर्व धन्य.


कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.


म्हणून आमचे एकमत झाल्यावर आम्हांला हे योग्य वाटले की,


त्याने त्याला त्याच्यावरील सर्व संकटांतून सोडवले आणि ‘मिसर देशाचा राजा फारो ह्याच्या दृष्टीने कृपापात्र’ व ‘ज्ञानी’ असे केले; म्हणून फारोने त्याला मिसर देशावर व आपल्या सर्व घरावर अधिकारी नेमले.


तेव्हा हनन्या निघाला आणि त्या घरी गेला; आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौल भाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावेस म्हणून मला पाठवले आहे.”


किंवा देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे हे न समजून तू त्याची ममता, क्षमा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?


कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन;


ते आम्ही मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी नव्हे तर पवत्र आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आध्यात्मिक गोष्टींबरोबर आध्यात्मिक गोष्टींची संगती लावून सांगतो.


माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला; आणि दुसरा त्यावर इमारत बांधत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहोत ह्याविषयी प्रत्येकाने जपावे.


म्हणजे प्रकटीकरणाच्या द्वारे मला रहस्य कळवले गेले, त्याप्रमाणे मी जे थोडक्यात वर लिहिले आहे,


तरी जे युगानुयुगाच्या जीवनासाठी त्याच्यावर विश्वास ठेवणार आहेत, त्यांना उदाहरण व्हावे म्हणून येशू ख्रिस्ताने, मी जो मुख्य त्या माझ्याविषयी आपली सर्व सहनशीलता दाखवावी म्हणून माझ्यावर दया झाली.


जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे म्हणजे ते त्याला मिळेल; कारण तो कोणास दोष न लावता सर्वांना उदारपणे देणग्या देतो;


वरून येणारे ज्ञान हे मुळात शुद्ध असते; शिवाय ते शांतिप्रिय, सौम्य, समजूत होण्याजोगे, दया व सत्फळे ह्यांनी पूर्ण, अपक्षपाती, निर्दंभ असे आहे.


हे आत्मे म्हणजे पूर्वी नोहाच्या दिवसांत तारू तयार होत असता देव सहन करत वाट पाहत होता त्या वेळी ज्यांनी त्याची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ आठ जण पाण्यातून वाचवण्यात आले.


ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि प्रभू व तारणारा ह्याने तुमच्या प्रेषितांच्या द्वारे दिलेल्या आमच्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.


कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan