Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

20 प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जे पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले. त्यांची शेवटची दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झालेली असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:20
20 Iomraidhean Croise  

मी कोणा नीतिमानास म्हणालो की, ‘तू खास वाचशील,’ आणि त्याने आपल्या नीतिमत्तेवर भिस्त ठेवून दुष्कर्म केले तर त्याची सर्व नीतिमत्ता जमेस धरण्यात येणार नाही; त्याने केलेल्या दुष्कर्मामुळे तो मरेलच.


याजकाने तपासणी करावी आणि जर कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसली व त्यावरील केस पांढरे झालेले असले, तर त्याने त्याला अशुद्ध ठरवावे; फोडातून बाहेर पडलेला हा महारोगाचा चट्टा होय.


मग ती वस्तू धुतल्यावर याजकाने तपासावी आणि त्या चट्ट्याचा रंग बदलला नसून तो चट्टा पसरला नसला, तरी तो अशुद्ध समजावा; ती वस्तू अग्नीत जाळून टाकावी; तो चट्टा आतील बाजूस असो किंवा बाहेरील बाजूस असो, ते पसरत जाणारे कुष्ठ समजावे.


दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला,


मग अमालेकास उद्देशून त्याने आपला काव्यरूपी संदेश दिला, “अमालेक राष्ट्रांमध्ये श्रेष्ठ होता, पण शेवटी तोही लयास जाईल.”


ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते!


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.


देव व आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हांला कृपा व शांती विपुल मिळो.


ज्याने तुम्हाआम्हांला आपल्या गौरवासाठी व सात्त्विकते-साठी पाचारण केले त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या ईश्वरी सामर्थ्याने, जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहेत;


त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.


कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील.


भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.


आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan