Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 भ्रमात असणार्‍या लोकांतून कोणी बाहेर पडले न पडले तोच ते लोक त्यांना व्यर्थपणाच्या फुगीर गोष्टी सांगतात व दैहिक वासनाधीन करून त्यांना कामातुरपणाचे मोह घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

18 भ्रमात असणाऱ्या लोकांतून कोणी बाहेर पडतो न पडतो, तोच हे लोक त्यांना व्यर्थपणाच्या गर्विष्ठ व मूर्ख गोष्टी सांगतात व वासनाधीन करून कामातुरपणाचा मोह घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 कारण जेव्हा चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:18
22 Iomraidhean Croise  

त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले.


ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोललात; ते मी ऐकले आहे.


तो राजा मनास येईल तसे वर्तेल; तो उन्मत्त होईल; सर्व दैवतांहून तो स्वतःला श्रेष्ठ समजेल आणि देवाधिदेवाविरुद्ध विलक्षण उद्धटपणाच्या गोष्टी बोलेल; कोपाची पूर्णता होईपर्यंत त्याची चलती राहील; जे नेमले आहे ते घडेलच.


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


आणखी त्याने दुसर्‍या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली व बोध करून म्हटले, “ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.”


त्या नगरात जादूगिरी करून शोमरोनी लोकांना थक्क करणारा असा शिमोन नावाचा एक माणूस होता, आणि आपण कोणीतरी मोठे आहोत असे तो दाखवत असे.


दिवसाढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. चैनबाजीत व मद्यपानात, विषयविलासात व कामासक्तीत, कलहात व मत्सरात नसावे.


म्हणून मी हे म्हणतो व प्रभूमध्ये निश्‍चितार्थाने सांगतो की, परराष्ट्रीय भ्रष्ट मनाने चालत आहेत त्याप्रमाणे तुम्ही ह्यापुढे चालू नये;


तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा भजनीय म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वत:ला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वत:चे प्रदर्शन करत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे.


तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला; ‘वधाच्या दिवशी’ तुम्ही आपल्या मनाची तृप्ती केली.


त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.


त्यांचे डोळे व्यभिचारी वृत्तीने भरलेले आहेत; आणि पाप केल्यावाचून त्यांना राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांना मोह घालतात; त्यांचे हृदय लोभाला सवकलेले आहे; ते शापग्रस्त (लोक) आहेत;


त्यांच्या कामातुर आचरणाचे अनुकरण पुष्कळ लोक करतील; त्यांच्यामुळे सत्य मार्गाची निंदा होईल.


प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या ज्ञानाच्या द्वारे जगाच्या घाणीतून सुटल्यावर ते पुन्हा जर तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले, तर त्यांची शेवटली दशा पहिल्या दशेपेक्षा वाईट झाली आहे.


आणि अधर्मी लोकांच्या कामातुर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट ह्याची सुटका केली;


तर प्रियजनहो, ह्या गोष्टी तुम्हांला पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतिप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा;


ते लज्जारूपी फेस दाखवणार्‍या समुद्राच्या विक्राळ लाटा, भ्रमण करणारे तारे, असे आहेत; त्यांच्यासाठी निबिड काळोख सर्वकाळ राखून ठेवलेला आहे.


नंतर मी दुसरे एक श्वापद भूमीतून वर येताना पाहिले; त्याला कोकरासारखी दोन शिंगे होती; ते अजगरासारखे बोलत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan