Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 2:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले, आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने ते गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आणि बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गास लागलेत; त्यास अनीतीचे वेतन प्रिय वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि अनीतीचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलाम ह्याच्या मार्गाने गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 ते सरळ मार्ग सोडून बहकले आहेत आणि दुष्टपणाचे वेतन प्रिय मानणारा बौराचा पुत्र बलामच्या मार्गाने गेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 2:15
21 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “मी इस्राएलास छळले नाही; तर तू व तुझ्या वडिलांच्या घराण्याने परमेश्वराच्या आज्ञा मानायचे सोडून बआलमूर्तींच्या नादी लागून इस्राएलास छळले आहे.


तो म्हणाला, “सेनाधीश देव परमेश्वर ह्याच्याविषयी मी फार ईर्ष्यायुक्त झालो आहे; कारण इस्राएल लोकांनी तुझा करार पाळण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मोडून टाकल्या, तुझे संदेष्टे तलवारीने वधले; मीच काय तो एकटा उरलो आहे; आणि आता ते माझाही जीव घेऊ पाहत आहेत.”


कारण ते अन्नपाणी घेऊन इस्राएल लोकांना सामोरे आले नाहीत, पण उलट शाप द्यावा म्हणून बलामास त्यांनी दक्षिणा देऊन बोलावले; तरी आमच्या देवाने त्या शापाचा आशीर्वाद केला.


शास्त्राज्ञा मोडणारे दुर्जनांची प्रशंसा करतात, पण नियमशास्त्र पाळणारे त्यांच्यावर संतापतात.


मी तर कृपादृष्टी करणार नाही, गय करणार नाही, त्यांच्या आचाराचे प्रतिफळ त्यांच्या शिरी लादीन.”


एफ्राइमाला ह्यापुढे मूर्तींशी काय कर्तव्य आहे? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन; मी हिरव्यागार सरूसारखा आहे; माझ्यापासून तुला फळ मिळते.


माझ्या प्रजे, मवाबाचा राजा बालाक ह्याने काय मसलत केली, बौराचा पुत्र बलाम ह्याने त्याला काय उत्तर केले आणि शिट्टीम व गिल्गाल ह्यांच्या दरम्यान काय झाले ह्याचे स्मरण कर, म्हणजे परमेश्वराची न्यायकृत्ये तुला समजतील.” परमेश्वराला काय हवे?


परमेश्वराचा दूत उपसलेली तलवार हाती घेऊन वाटेत उभा असल्याचे त्या गाढवीने पाहिले, तेव्हा ती वाट सोडून शेतात शिरली; तिला पुन्हा वाटेवर आणण्यासाठी बलामाने तिला मारले.


तेव्हा परमेश्वराने त्या गाढवीला वाचा दिली. ती बलामाला म्हणाली, “मी तुझे काय केले म्हणून तू तीनदा मला मारलेस?”


परमेश्वराचा दूत त्याला म्हणाला, “तू तीन वेळा आपल्या गाढवीला का मारलेस? पाहा, तुला अडवण्यासाठी मी पुढे सरसावलो आहे, कारण तुझे आचरण मला विपरीत दिसते;


पाहा, पौराच्या प्रकरणी इस्राएल लोकांनी परमेश्वराशी फितुरी केली त्याला ह्याच स्त्रिया बलामाच्या मसलतीमुळे कारणीभूत झाल्या आणि त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीत मरी पसरली.


हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.”


(त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले; तो पालथा पडल्याने त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली.


“अरे सर्व कपटाने व सर्व लुच्चेगिरीने भरलेल्या सैतानाच्या पोरा, अवघ्या नीतिमत्त्वाच्या वैर्‍या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय?


अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते.


त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण ते काइनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलामाच्या भ्रांतिमार्गात बेफामपणे घुसले आणि कोरहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला.


तथापि तुला थोड्या गोष्टींविषयी दोष देणे मला प्राप्त आहे; त्या ह्या की, ‘बलामाच्या’ शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत; त्याने ‘मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाणे व जारकर्म करणे,’ हे अडखळण ‘इस्राएलाच्या संतानांपुढे’ ठेवण्यास बालाकाला शिकवले.


तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो; मी तुम्हांला चांगला व सरळ मार्ग दाखवतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan