Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ह्याच कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्त्विकतेची, सात्त्विकतेत ज्ञानाची,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

5 ह्याच कारणासाठी तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात चांगुलपणाची, चांगुलपणात ज्ञानाची,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 कारण याच कारणासाठी, तुमच्या विश्वासामध्ये चांगुलपणाची भर घालण्याचा प्रयत्न करा; चांगुलपणात ज्ञानाची;

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:5
25 Iomraidhean Croise  

तुझे विधी आम्ही मनःपूर्वक पाळावेत म्हणून तू ते आम्हांला लावून दिले आहेत.


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


“मग जे दूर आहेत ते येतील व परमेश्वराचे मंदिर बांधण्यास हातभार लावतील आणि सेनाधीश परमेश्वराने मला तुमच्याकडे पाठवले आहे हे तुम्हांला कळून येईल. परमेश्वर तुमचा देव ह्याचे तुम्ही लक्ष देऊन ऐकाल तर हे घडून येईल.”


एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.’


परंतु इस्राएलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती. शिवाय ह्या सर्व गोष्टी झाल्या तेव्हापासून आज तिसरा दिवस आहे.


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा.


म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या.


माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी;


म्हणून माझ्या प्रिय जनहो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात, ते तुम्ही, मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेषेकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कापत आपले तारण साधून घ्या;


बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदर णीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.


ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की, सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्या द्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे;


त्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत.


आणि विश्वासावाचून त्याला ‘संतोषवणे’ अशक्य आहे; कारण देवाजवळ जाणार्‍याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे.


देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील असे कोणतेही “कडूपणाचे मूळ” अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये, कोणी जारकर्मी होऊ नये, किंवा ज्याने एका जेवणासाठी ‘आपले ज्येष्ठपण विकले’ त्या ‘एसावासारखे’ कोणी ऐहिक बुद्धीचे होऊ नये, म्हणून ह्याकडे लक्ष द्या.


आमची अशी इच्छा आहे की, तुमच्यापैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खातरी करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी;


नंतर ते यहोशवाकडे परत येऊन म्हणाले, “सर्व लोकांनी तेथे जायला नको, फक्त दोन-तीन हजार पुरुषांनी जाऊन आय नगरावर हल्ला करावा; तेथे सर्व लोकांना जाण्याचे कष्ट देण्याची गरज नाही, कारण ते लोक थोडकेच आहेत.”


पतींनो, तसेच तुम्हीही आपापल्या स्त्रीबरोबर, ती अधिक नाजूक पात्र आहे म्हणून सुज्ञतेने सहवास ठेवा; तुम्ही उभयता जीवनरूपी कृपादानाचे समाईक वतनदार आहात, म्हणून तुम्ही त्यांना मान द्या; म्हणजे तुमच्या प्रार्थनांत व्यत्यय येणार नाही.


म्हणून बंधूंनो, तुम्हांला झालेले पाचारण व तुमची निवड दृढ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. असे तुम्ही केल्यास तुमचे पतन कधीही होणार नाही;


आणि अशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सवाने तुमचा प्रवेश होईल.


म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहत असता तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा,


आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात2 वाढत जा. त्याला आता व अनंतकालपर्यंत गौरव असो. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan