Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 त्याच्या योगे मूल्यवान व अतिमहान अशी अभिवचने आपल्याला देण्यात आली आहेत, ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याद्वारे त्यांनी आपल्याला त्यांची अतिमहान आणि मोलवान अभिवचने दिली आहेत, यासाठी की त्याद्वारे त्यांच्या दैवीस्वभावात आपण सहभागी व्हावे व जगाच्या भ्रष्टतेतून निर्माण होणार्‍या वाईट वासनेपासून आपली सुटका व्हावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:4
25 Iomraidhean Croise  

ते इस्राएली आहेत; दत्तकपणा, ईश्वरी तेज, करारमदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत;


देवाची वचने कितीही असोत, त्याच्या ठायी होय हे आहे;2 म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्या द्वारे आमेन म्हणतो.


परंतु आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत;2 आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत.


म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभू म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका; म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’


अब्राहामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. “संतानांना” असे पुष्कळ जणांसंबंधाने तो म्हणत नाही; तर “तुझ्या संतानाला” असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे.


जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल; आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल.


देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत, ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहचू तोपर्यंत दिले;


आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे.


त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते; पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो.


आणि तो नव्या कराराचा मध्यस्थ ह्याचकरता आहे की, पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने, सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे.


देवपित्याच्या दृष्टीने शुद्ध व निर्मळ धर्माचरण म्हणजे अनाथांचा व विधवांचा त्यांच्या संकटांत समाचार घेणे, व स्वतःला जगापासून निष्कलंक ठेवणे हे आहे.


आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून :


तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते असे ‘नवे आकाश’ व ‘नवी पृथ्वी’ ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.


कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो; कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्‍चात्ताप करावा अशी आहे.


हे जे अभिवचन त्याने स्वत: आपल्याला दिले आहे तेच सार्वकालिक जीवन होय.


प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan