Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




2 पेत्र 1:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 कारण त्याला देवपित्यापासून सन्मान व गौरव मिळाला; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्या द्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

17 त्याला देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाला, तेव्हा सर्वोच्च गौरवशाली देवाकडून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र आहे, तो मला परमप्रिय आहे, मी त्याच्यावर प्रसन्न आहे!’

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांना परमेश्वरपित्याकडून सन्मान आणि गौरव मिळाले, तेव्हा सर्वोच्च गौरवी परमेश्वराकडून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




2 पेत्र 1:17
36 Iomraidhean Croise  

पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, ह्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; ह्याच्या ठायी मी आपला आत्मा घातला आहे; तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल.


त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.


“पाहा, हा माझा सेवक, ह्याला मी निवडले आहे; तो मला परमप्रिय आहे; त्याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; त्याच्यावर मी आपला आत्मा घालीन, तो परराष्ट्रीयांना न्याय कळवील.


तेव्हा पाहा, मोशे व एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.


तो बोलत आहे इतक्यात, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली; आणि पाहा, मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे;’ ह्याचे तुम्ही ऐका.”


तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या;


आणि पाहा, आकाशातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘पुत्र’, मला ‘परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”’


तेव्हा आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा पुत्र, मला परमप्रिय आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”


तेव्हा एक मेघ आला व त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा ‘प्रिय पुत्र आहे, ह्याचे तुम्ही ऐका.”’


माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे; पुत्र कोण आहे हे पित्यावाचून कोणाला ठाऊक नाही; आणि पिता कोण आहे हे पुत्रावाचून व ज्याला तो प्रकट करायची पुत्राची इच्छा असेल त्याच्यावाचून कोणाला ठाऊक नाही.”


पवित्र आत्मा देहरूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला, आणि आकाशातून अशी वाणी झाली की, “तू माझा प्रिय पुत्र आहेस, तुझ्याविषयी मी संतुष्ट आहे.”


तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, ‘मी देवाचा पुत्र आहे’ असे म्हटल्यावरून ‘तुम्ही दुर्भाषण करता’ असे तुम्ही म्हणता काय?


मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.


येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.


ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.


येशूने तिला म्हटले, “मला बिलगून बसू नकोस; कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही; तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.”


पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.


कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो. तुम्हांला आश्‍चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील.


कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वत:चे जीवन असावे असे त्याने त्याला दिले;


नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.”


पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.


आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे.


आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो.


आपल्या प्रभू येशूचा देव व पिता, जो युगानुयुग धन्यवादित आहे त्याला ठाऊक आहे की, मी खोटे बोलत नाही.


हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्त्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे, आणि [स्वतः आमच्या] पापांची शुद्धी केल्यावर तो उर्ध्वलोकी राजवैभवाच्या ‘उजवीकडे बसला.’


देवपित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील.


देवपित्याने पवित्र केलेले आणि येशू ख्रिस्तासाठी राखून ठेवलेले असे पाचारलेले लोक ह्यांना येशू ख्रिस्ताचा दास व याकोबाचा बंधू यहूदा ह्याच्याकडून :


Lean sinn:

Sanasan


Sanasan