Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 9:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर ओत व असे बोल, ‘परमेश्वर म्हणतो, तू इस्राएलाचा राजा व्हावेस म्हणून मी तुला अभिषेक केला आहे.’ मग दार उघडून पळ काढ, थांबू नकोस.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यानंतर ही तेलाची कुपी घेऊन त्याच्या मस्तकावर तेल ओत. तेव्हा ‘परमेश्वर म्हणतो की इस्राएलचा राजा म्हणून मी तुला अभिषेक केला आहे,’ असे म्हण. एवढे झाले की धावत परत ये. तेथे थांबू नकोस!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग कुपी घे आणि तेल त्याच्या मस्तकांवर ओत आणि जाहीर कर, ‘याहवेह असे म्हणतात: मी तुझा इस्राएलाचा राजा म्हणून अभिषेक करतो.’ नंतर दार उघड आणि पळ; उशीर करू नकोस!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 9:3
23 Iomraidhean Croise  

तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमावे, आणि कर्णा वाजवून, शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे.


निमशीचा पुत्र येहू ह्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेम; तसेच आबेल-महोला येथील शाफाटाचा पुत्र अलीशा ह्याला अभिषेक करून तुझ्या जागी संदेष्टा नेम.


हजाएल म्हणाला, “आपला दास तर केवळ कुत्रा आहे; तो असली मोठी कृत्ये कशी करणार?” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार हे परमेश्वराने मला कळवले आहे.”


तेव्हा तो उठून घरात गेल्यावर त्या शिष्याने त्याच्या मस्तकावर तेल ओतून म्हटले, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुला परमेश्वराच्या लोकांचा म्हणजे इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून अभिषेक केला आहे;


अहज्याचा नाश देवाकडून झाला, कारण त्याने योरामाची संगत धरली होती; अहाबाच्या घराण्याचा उच्छेद करावा म्हणून परमेश्वराने येहू बिन निमशी ह्याला अभिषिक्त केले होते; त्याच्याशी सामना करावा म्हणून तो तेथे येऊन यहोरामाबरोबर निघाला होता.


नंतर अभिषेकाचे तेल त्याच्या डोक्यावर ओतून त्याला अभिषेक कर.


नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली.


पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही.


हे राजा, परात्पर देवाने तुझा बाप नबुखद्नेस्सर ह्याला राज्य, महत्त्व, वैभव व महिमा ही दिली.


त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.


पाहा, लांडग्यांमध्ये मेंढरांना पाठवावे तसे मी तुम्हांला पाठवतो; म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर व कबुतरांसारखे निरुपद्रवी व्हा.


ते गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.”


कोणीएक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावर ती ओतली.


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपली प्रजा इस्राएल लोक ह्यांच्यावर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवले होते; तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक.


शमुवेल म्हणाला, “तू आपल्या दृष्टीने क्षुद्र होतास तरी तुला इस्राएली कुळांचा नायक केले ना? आणि तू इस्राएलाचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना?”


शमुवेल म्हणाला, “मी जाऊ कसा? शौलाने हे ऐकले तर तो मला जिवे मारील.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आपल्याबरोबर एक कालवड घेऊन जा आणि सांग की, ‘मी परमेश्वराप्रीत्यर्थ यज्ञ करायला आलो आहे.’


“उद्या ह्या सुमारास मी तुझ्याकडे बन्यामिनी प्रांतातला एक मनुष्य पाठवीन, त्याला अभिषेक करून माझ्या इस्राएल लोकांवर अधिपती नेम; तो माझ्या लोकांना पलिष्ट्यांच्या हातून सोडवील; कारण माझ्या लोकांचे गार्‍हाणे माझ्याकडे आले आहे म्हणून त्यांच्याकडे माझी नजर गेली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan