२ राजे 8:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 ज्या स्त्रीच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते तिला त्याने सांगितले, “तू आपल्या घरची मंडळी घेऊन सोईस्कर असेल त्या देशात जाऊन राहा, कारण परमेश्वर दुष्काळ पाठवणार आहे व तो ह्या देशात सात वर्षे चालू राहणार आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 अलीशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 अलीशाने ज्या स्त्रीच्या मुलास जिवंत केले होते, तिला म्हणाला, “तुझ्या कुटुंबीयांनी घेऊन निघून जा आणि जिथे तुला राहता येईल तिथे राहा, कारण याहवेह या भूमीवर मोठा दुष्काळ पाठविणार आहेत आणि तो सात वर्षे टिकणार आहे.” Faic an caibideil |
तेव्हा गादाने दाविदाकडे जाऊन त्याला हे सांगितले; त्याने त्याला विचारले, “तुझ्या देशात सात वर्षे दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझे शत्रू तुझा पाठलाग करीत असताना तू त्यांच्यापुढे पळत राहावे, किंवा तुझ्या देशात तीन दिवस मरी यावी? ह्याचा चांगला विचार कर; ज्याने मला पाठवले त्याला मी काय उत्तर देऊ ते पाहा.”