२ राजे 7:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसाला म्हटले, “पाहा, परमेश्वराने आकाशकपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?” त्याने त्याला म्हटले, “तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील पण त्यांतले काही खाणार नाहीस.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा राजाच्या अगदी निकट असलेला एक अधिकारी अलीशाला म्हणाला, “परमेश्वराने आकाशाला खिंडारे पाडली तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशा त्यास म्हणाला, “आपल्या डोळ्यांनी तू ते बघशीलच पण तू मात्र त्यातले काही खाऊ शकणार नाहीस.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!” Faic an caibideil |
परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी; म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करायला जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो, आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्याला मी नमन करत असतो; ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्याला नमन करीन तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी.”