Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ राजे 7:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 तेव्हा अलीशा म्हणाला, “तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका; परमेश्वर म्हणतो : उद्या ह्याच वेळी शोमरोनाच्या वेशीत एक माप सपीठ एका शेकेलाला व दोन मापे सातू एका शेकेलाला मिळतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 अलीशा म्हणाला, परमेश्वराचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका, परमेश्वर म्हणतो या वेळेपर्यंत अन्नधान्याची रेलचेल होईल. शिवाय ते स्वस्तही असेल. शोमरोनच्या वेशीजवळच्या बाजारपेठेत एका शेकेलला मणभर मैदा किंवा दोन मण सातू सहज मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला एक सिआ सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ सातू मिळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ राजे 7:1
19 Iomraidhean Croise  

मीखाया म्हणाला, “तर आता तू परमेश्वराचे वचन ऐक : परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान झालेला व त्याच्या उजवीकडे व डावीकडे स्वर्गातील सर्व सेना उभी आहे असे माझ्या दृष्टीस पडले.


तेव्हा यशया हिज्कीयाला म्हणाला, “परमेश्वराचे वचन ऐक :


बआल-शालीशा येथील कोणी मनुष्य आपल्या प्रथमउपजातील जवाच्या वीस भाकरी आणि धान्याची हिरवी कणसे पोत्यात घालून देवाच्या माणसाकडे घेऊन आला. अलीशा त्याला म्हणाला, “ह्या माणसांना हे वाटून दे, त्यांना हे खाऊ दे.”


तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली; वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्याला ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेला पाच रुपये पडू लागले.


तो त्यांच्याशी असे बोलत आहे इतक्यात जासूद त्याच्याकडे येऊन पोहचला. तो म्हणाला, “ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे तर ह्यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी?”


तेव्हा लोकांनी बाहेर पडून अरामी लोकांचे डेरे लुटले. ह्याप्रमाणे परमेश्वराच्या वचनानुसार एका शेकेलाला मापभर सपीठ व एका शेकेलाला दोन मापे सातू विकू लागले.


त्या नगरीच्या ठायी देव आहे; ती ढळावयाची नाही; प्रभात होताच देव तिला साहाय्य करील.


मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करील ते पाहा, कारण ज्या मिसरी लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते पुन्हा कधीही तुमच्या नजरेस पडणार नाहीत.


“इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”


माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखीन; उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल.”’


सदोमाच्या अधिपतींनो, परमेश्वराचे वचन ऐका; गमोर्‍याच्या लोकांनो, आमच्या देवाच्या नियमशास्त्राकडे कान द्या.


तेव्हा तो मला म्हणाला, “ह्या अस्थींविषयी संदेश देऊन त्यांना म्हण, शुष्क अस्थींनो, परमेश्वराचे वचन ऐका :


“येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या पाच भाकरी व दोन मासळ्या आहेत; परंतु त्या इतक्यांना कशा पुरणार?”


मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.”


आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी : “रुपयाला शेरभर गहू, आणि रुपयाला तीन शेर जव; तेल व द्राक्षारस ह्यांची हानी करू नकोस!”


त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला.


शमुवेल शौलाला म्हणाला, “परमेश्वराने आपली प्रजा इस्राएल लोक ह्यांच्यावर राजा होण्यासाठी तुला अभिषेक करण्यास मला पाठवले होते; तर आता परमेश्वराचे म्हणणे ऐक.


Lean sinn:

Sanasan


Sanasan